Raj Thackeray : अजितदादांची नक्कल, 70 हजार कोटींचा घोटाळा अन् भाजपमध्ये टुणकन उडी

  • Written By: Published:
Raj Thackeray : अजितदादांची नक्कल, 70 हजार कोटींचा घोटाळा अन् भाजपमध्ये टुणकन उडी

मुंबई : अजितदादांच्या बंडखोरीचा मुद्दा अद्यापही थंड होताना दिसत नसून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पनवले येथील निर्धार मेळाव्यात अजितदादांना तोफेच्या तोंडी धरले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचे तुरूंगातील अनुभव लक्षात घेता जेल पेक्षा भाजप बरं या भुजबळांच्या कथाकथनानंतरच अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज यांनी अजितदादांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली.

‘आमदार फोडू नका, पक्ष उभा करायला शिका’; राज ठाकरेंनी भाजपलाही धुतलं

अजित पवार म्हणे सत्तेतून महाराष्ट्राचा विकास करायला गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे निघाले. भुजबळांनी पण सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. हे सर्व ऐकल्यानंतरच अजित पवार म्हणाले असतील जेल पेक्षा भाजपकडे गेलेलं बरं आणि त्यातूनच हे सर्व घडलं आहे. 70 हजार कोटींच्या आरोपानंतर टुणकन इकडे आल्यचेही ठाकरे म्हणाले.

अजितदादांची नक्कल अन् टीका

राज ठाकरे नेहमी भाषणावेळी कोणत्या ना कोणत्या नेत्यांची नक्कल करत असतात. आजही त्यांनी निर्धार मेळाव्यात अजित पवारांची नक्कल केली. दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांची गुप्त बैठक झाली. त्यावर अजित पवारांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. या उत्तराची नक्कल राज ठाकरेंनी यावेळी करून दाखवत 70 हजार कोटींच्या आरोपानंतर टुणकन इकडे आल्याचे सांगितले.

‘मलाही चेकमेट करण्याचा डाव पण, आम्ही राजकारणातले ग्रँडमास्टर’; CM शिंदेंची विरोधकांवर तिरकी चाल

बाहेरून आलेली ती लोकं गाडीत झोपून जाणार आणि मग म्हणणार मी होतो का त्या गाडीत…, म्हणायचं. निर्लज्जपणाचा कळस सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. आपण या सरकारमध्ये का आलात तर म्हणाले महाराष्ट्राचा विकास करायचाय मल, अरे कशाला खोटं बोलताय. नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींच्या आरोप केले की, टुणकन सगळे इकडे आले, असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

शरद पवार अन् अजितदादांच्या बैठकीत काय घडलं? सुप्रिया सुळेंच्या उत्तरानेही संभ्रम कायम

भाजपच्या फोडाफोडीवर हल्लाबोल

यावेळी राज यांनी भाजपच्या फोडाफोडीवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की,  भाजपने इतर पक्षांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभारायला शिकावं. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वतःचा पक्ष उभारायला भाजपनं शिकावं. लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या अन् त्यांना पक्षात घ्यायचं. त्यापेक्षा स्वत:चा पक्ष उभा करा, असं राज ठाकरे म्हणाले. खोके… खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर असल्याची टीकाही राज यांनी यावेळी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube