शरद पवार अन् अजितदादांच्या बैठकीत काय घडलं? सुप्रिया सुळेंच्या उत्तरानेही संभ्रम कायम
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. या भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना पुण्यातील या भेटीबाबत प्रश्न विचारला. त्यावर सुळे म्हणाल्या, चोरडियांच्या घरी झालेल्या बैठकीत मी नव्हते. चोरडिया आणि पवार कुटुंबाचे संबंध फार जुने आहेत. एकतर त्या बैठकीत मी नव्हते. त्यामुळे तिथं काय झालं हे मला माहिती नाही. माझ्या आणि अजितदादाच्या जन्माआधीपासून पवार आणि चोरडिया कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. पवार साहेब आणि अतुल चोरडियांचे वडील एकाच वर्गात होते. राजकारणात मतभेद असतात. ते असलेच पाहिजेत.
‘आधी प्रायश्चित्त घ्या, आरोग्यमंत्र्यांना पायउतार करा’; कळव्यातील मृत्यूप्रकरणी ठाकरे गटाचा घणाघात
एनडी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील या पवार साहेबांच्या बहीण आहेत. अनेक धोरणात शरद पवार आणि एनडी पाटील एकेमेकांच्या विरोधात उभे राहिले. म्हणून आत्याचं आमच्यावरच प्रेम किंवा आमचं आत्यावरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. आमचे राजकीय विचार आणि कौटुंबिक नात्याता ओलावा कधीही कमी होऊ दिला नाही. एनडी पाटील आणि शरद पवारांचं हे उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं आहे. आज तशीच परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. एका वैचारिक बैठकीत दादाला ते योग्य वाटत असेल तर लोकशाहीत आपण सगळ्यांनीच ते मान्य केलं पाहिजे. आम्ही ज्या विचारांच्या बैठकीत बसतो ते कदाचित दादापेक्षा वेगळे असू शकते.
नवाब मलिक जामीनावर बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर आता नवाब मलिक कोणत्या गटात जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. यावरही सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्या म्हणाल्या, राजकीय निर्णय घेण्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण, नवाब मलिकांना कुणी अडचणीत आणलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने मलिक यांच्यावर अन्याय केल्याची टीका सुळे यांनी केली.
पवारांना ऑफर देण्याइतके अजितदादा मोठे नाही; राऊतांनी दाखवली जागा