Strait of Hormuz : इराण-अमेरिका युद्धात होर्मुझची जगभर चर्चा! पण, ‘होर्मुझ’ नाव कसं पडलं? अर्थ काय?

Strait of Hormuz होर्मुझची समुद्रधुनी चर्चेचा विषय बनली असून, हा शब्द मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे....

Strait of Hormuz : इराण-अमेरिका युद्धात होर्मुझची जगभर चर्चा! पण, 'होर्मुझ' नाव कसं पडलं? अर्थ काय?

Strait of Hormuz : इराण-अमेरिका युद्धात होर्मुझची जगभर चर्चा! पण, 'होर्मुझ' नाव कसं पडलं? अर्थ काय?

History & Name Meaning Of Strait of Hormuz : सध्या सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष एका अरुंद सागरी मार्गाकडे लागले आहे, तो मार्ग म्हणजे ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz). होर्मुझची समुद्रधुनी चर्चेचा विषय बनली असून, हा शब्द मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, या समुद्रधुनीला ‘होर्मुझ हे नाव कसं पडलं? त्याचा नेमका अर्थ काय? याबद्दल जाणून घेऊया…

होर्मुझच्या सामुद्रधुनी नाव कसे पडले?

“होर्मुझ” या नावाबद्दल इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. मात्र, काही महत्त्वाचे आणि मनोरंजक सिद्धांत आहेत. होर्मुझ हे केवळ एका सामुद्रधुनीचे नाव नसून ते एक प्राचीन शहर आणि एक सागरी साम्राज्य देखील होते. होर्मुझची मूळ वस्ती इराणी किनाऱ्याजवळ होती असे मानले जाते. नंतर, सागरी व्यापाराचा विस्तार होत असताना, शासकांनी त्यांचे तळ एका बेटावर स्थलांतरित केले. हे बेट पर्शियन आखाताच्या तोंडावर असल्याने होर्मुझ बेट म्हणून ओळखले जाऊ लागले. परिणामी, आजूबाजूचा समुद्री मार्गदेखील होर्मुझशी जोडला जाऊ लागला.

10 व्या ते 17 व्या शतकादरम्यान, होर्मुझ साम्राज्याने समुद्री व्यापारावर मजबूत पकड बनवली. याठिकाणी अरबस्तान, पर्शिया, भारत, पूर्व आफ्रिका आणि आग्नेय आशिया दरम्यान जाणारी जहाजे या बंदरावर थांबत असतं. या ठिकाणाहून मसाले, मोती, घोडे, मौल्यवान दगड, कापड आणि धातूंचा मोठा व्यापार होत असे. कालांतराने बोलीभाषेत आणि अधिकृत नोंदींमध्ये हा परिसर होर्मुझ म्हणून इतका प्रसिद्ध झाला की,सामुद्रधुनीला कायमचे
होर्मुझ असे नाव देण्यात आले.

होमुर्झ नावामागचं कारण

पर्शियन आणि अवेस्ता परंपरेत देवाचे एक प्रमुख नाव अहुरा मज्दा आहे. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की, कालांतराने, अहुरा मज्दा हे ओरमज्द किंवा ओहरमज्द सारख्या स्वरूपात विकसित झाले. स्थानिक उच्चारांमध्ये, हे ओरमुझ, होर्मुझ आणि नंतर होर्मुझ बनले. हा बदल एक सामान्य भाषिक प्रक्रिया आहे, कारण मोठी नावे लहान रूपे घेतात. ध्वनी बदलतात, परंतु मूळ नावाशी त्यांचा संबंध कायम राहतो.

स्थानिक उच्चार आणि परदेशी लेखकांचा प्रभाव

होर्मुझ नावाला वेगवेगळ्या स्वरूपात लिहिले आणि उच्चारले गेले आहे. अरबी आणि पर्शियन लेखनात, ते कधीकधी हुर्मुझ, तर कधीकधी होर्मुझ असे लिहिले जाते. युरोपियन प्रवासी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषांनुसार याला ओर्मुझ, होर्मुझ, ओर्मस इत्यादी म्हणून नोंदवले आहे. याबाबत मार्को पोलो, पोर्तुगीज, डच आणि इंग्रजी स्त्रोतांमध्ये याबाबत उल्लेख आहे. त्यानंतर कालांतराने, इंग्रजीमध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ प्रचलित झाले.

होमुर्झचा अर्थ अन् धोरणात्मक महत्त्व

स्ट्रेटचा अर्थ होतो समुद्रधुनी. म्हणजे दोन मोठ्या समुद्रांना जोडणारा अरुंद पाण्याचा साठा होय. होर्मुझ हे फक्त एक नाव नाही तर शक्ती आणि नियंत्रणाचे प्रतीक देखील आहे. कारण धोरणात्मकदृष्ट्या, या मार्गाचे नियंत्रण करणारा देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या चाव्यादेखील बाळगतो. त्यामुळे युद्धादरम्यान किंवा अन्य कारणांमुळे जरी हा मार्ग काही दिवसांसाठी बंद राहिला तर, जागतिक शेअर बाजार कोसळून महागाई गगनाला भिडू शकते.

होर्मुझची समुद्रधुनी केवळ एक पाण्याचा मार्ग नाही, तर जागतिक उर्जा सुरक्षेची जीवनदायी म्हणूनदेखील ओळखली जाते यामागे ठोस कारणं असून, सौदी अरेबिया, इराक, यूएई आणि कुवेत यांसारखे देश दररोज सुमारे 2 कोटी तेलाचे बॅरल याच मार्गाने जगाला पाठवतात. याशिवाय कतार जगातला सर्वात नैसर्गिक वायू निर्यातदार आहे. ज्यावर जगातील अनेक देशांची वीज निर्मिती अवलंबून आहे.

Exit mobile version