Download App

Sudan Crisis: ऑपरेशन ‘कावेरी’ सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले

Sudan Crisis: सुदानमध्ये सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून अंतर्गत यादवी (Sudan Crisis) सुरू आहे. यामुळे त्या ठिकाणी राहायला असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र विभागाकडून मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) राबवण्यात आले आहे.

सूदानची राजधानी खार्तुमसह अनेक ठिकाणी सुरु असलेला हिंसाचार सुदानमधील स्थिती अस्थिर बनवत आहे. भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचे काम सध्या सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान आतापर्यंत २३१ नागरिकांना सुखरुप घेऊन भारतीय वायुसेनाचे विमान नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे.

यासंदर्भातली माहिती परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी ट्विट करत सांगितली आहे. तसेच इंडिगो एअरलाईन कंपनीने देखील सांगितले आहे की, ‘सुदानमधील अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरीला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहे. तसेच आम्ही याकरिता भारत सरकारला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आम्ही मानवी सुरक्षेच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचले आहे. यामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचविण्यात येणार आहे. भारतीय वायुदलाने २७ आणि २८ एप्रिल रोजी एक साहसी गोष्ट करुन दाखवली आहे. ऑपरेशन कावेरी अंतर्गत वायुसेनेच्या c-120J या विमानाने एका छोट्या हवाईपट्टीत विमान लँड करत १२१ भारतीय नागरिकांचे प्राण वाचवले आहे.

ऑपरेशन कावेरी ! सुदानमध्ये अडकलेल्या 278 भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहला रवाना

मिळालेल्या माहितीनुसार या १२१ लोकांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश होता. तसेच गुरुवारी २० एप्रिल रोजी १३५ भारतीय नागरिकांना घेऊन वायुसेनेचे IAF C-130J विमान परतले आहे. तसेच १६०० भारतीय सुखरुप मायदेशी परतत्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी ट्विट करत दिली आहे.

सुदानमध्ये गेल्या १५ दिवसांपासून लष्करी आणि निमलष्करी दलात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. भारत सरकारकडून सुदानमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी २४ एप्रिलपासून ऑपरेशन कावेरी राबवले जात आहे.

Tags

follow us