Sunita Williams Spacewalk : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) अंतराळात आहे. ती पृथ्वीवर मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला परतणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत नासाकडून (NASA) कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
तर दुसरीकडे अंतराळात उद्या म्हणजेच 16 जानेवारी रोजी सुनीता विल्यम्स चमत्कार करणार आहे. होय, तब्बल 12 वर्षानंतर सुनीता विल्यम्स स्पेसवॉक (Spacewalk) करणार आहेत. माहितीनुसार, त्यांचा स्पेसवॉक तब्बल साडेसहा तासांचा असणार आहे आणि यावेळी निक हेग देखील त्यांच्यासोबत असणार आहे.
सुनीता विल्यम्सने 12 वर्षांपूर्वी शेवटचा स्पेसवॉक केला होता. त्यामुळे नासा देखील या वॉकबद्दल खूप उत्साहित आहे. नासाने या स्पेसवॉकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंतराळवीर निक हेग (Nick Hague) आणि सुनीता विल्यम्स यांनी गेल्या आठवड्यात साडेसहा तासांच्या स्पेसवॉकपूर्वी फिटनेस तपासणीसाठी अंतराळ स्थानकात सूट घातले होते. अशी देखील माहिती नासाकडून देण्यात आली आहे.
नासा स्पेसवॉकचे थेट प्रक्षेपण देखील करणार आहे ज्यामुळे नागरिकांना अवकाश जगाची ओळख करून घेता येणार आहे. 16 जानेवारी रोजी होणारा हा स्पेसवॉक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे तर दुसरा स्पेसवॉक23 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6.45 वाजता होणार आहे. या स्पेसवॉकचे थेट प्रक्षेपण नासाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पाहता येणार आहे.
NASA astronauts @AstroHague and @Astro_Suni suited up inside @Space_Station last week for fit checks ahead of their 6.5-hour spacewalk this Thursday. pic.twitter.com/pZL10VnI7k
— NASA Astronauts (@NASA_Astronauts) January 14, 2025
काय असतो स्पेसवॉक ?
स्पेसवॉक म्हणजे जेव्हा एखादा अंतराळवीर प्रयोग करण्यासाठी किंवा स्पेस स्टेशन दुरुस्त करण्यासाठी अंतराळ स्थानकाच्या बाहेर जातो. यावेळी स्पेसवॉकद्वारे, सुनीता आणि निक हेग नासाच्या NICER एक्स-रे दुर्बिणीची दुरुस्ती करतील. याव्यतिरिक्त, कॅनडार्म 2 रोबोटिक आर्म अपडेट करणे देखील समाविष्ट आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे आणखी एक सहकारी विल्मोर बुच 5 जून रोजी अंतराळ कक्षेत पोहोचले होते.
दोघांनाही एक आठवडा अंतराळात राहावे लागले आणि नंतर परतावे लागले. पण स्टारलाइनर अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विल्मोर दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत.
स्टीव्ह जॉब्स यांच्या कुंभमेळ्यावरील पत्राचा 4.32 कोटींना लिलाव; लिहलं होतं की, मला भारतात….
अमेरिकेची अंतराळ संस्था, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनने हे अंतराळयान परतीच्या उड्डाणासाठी खूप धोकादायक मानले आहे, त्यामुळे त्यांचे दीर्घ आणि कठीण अभियान पूर्ण होण्यासाठी मार्च किंवा एप्रिलपर्यंतचा कालावधी लागेल.