Download App

Tech layoffs : Apple, Dell सह अनेक कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार, हजारो कर्मचारी बेरोजगार

  • Written By: Last Updated:

Tech layoffs March 2024 : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च संपत आल्यानंतरही अनेक दिग्गज आयटी कंपन्यांवरी टाळेबंदीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे. Apple, Dell, IBM यासह अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. कंनन्यांच्या या निर्णयामुळे जगभरातील लाखो कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

मोठी बातमी : ‘तुतारी’ हाती घेताच निलेश लंकेंना नगरमधून उमेदवारी; पवार गटाची पहिली यादी जाहीर

5G ची मागणी मंदावली Ericsson ने कमी केले 1200 कर्मचारी

5G नेटवर्क उपकरणांची मागणी कमी होत असल्याने स्वीडिश दूरसंचार कंपनी एरिक्सनने 25 मार्च रोजी स्वीडनमधील सुमारे 1,200 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने सल्लागार कमी करणे, प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि सुविधा कमी करणे आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कंपनीने साधारण 8,500 कर्मचारी कपात केली होती.

डेलची सगल दुसऱ्यावर्षी कर्मचारी कपात

डेल टेक्नॉलॉजीजने दोन वर्षांत दुसऱ्यांदा कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीमध्ये, डेलची हेडकाउंट जवळपास 1,20,000 झाला आहे. जो 2023 मध्ये सुमारे 1,26,000 इतका होता. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत डेलच्या महसुलात 11 टक्क्यांनी घट झाली आहे.

परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा

Apple : ब्लूमबर्गने अहवाल दिला की Apple ने भविष्यातील Apple Watch मॉडेलसाठी microLED डिस्प्ले विकसित करण्याचे त्यांचे अंतर्गत प्रयत्न थांबवले आहेत ज्यामुळे त्यांनी आपल्या डिस्प्ले अभियांत्रिकी संघांची पुनर्रचना केली आणि युनायटेड स्टेट्स आणि आशियातील अनेक डझन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

IBM : इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन (IBM) ने कंपनीच्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभागातील नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही कपात नेमकी किती आहे याच्या आकडेवारीबाबत कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही. IBM चे मुख्य संपर्क अधिकारी जोनाथन अदाशेक यांनी सात मिनिटांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला आहे. याशिवाय प्लॅगारिझम डिटेक्शन फर्म टर्निटिनने या वर्षाच्या सुरुवातीला सुमारे 15 लोकांना कामावरून काढून टाकले आहे.

follow us

वेब स्टोरीज