Download App

गुगलला दणका! जपानमध्ये Pixel 7 स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी; कोर्टाचा निर्णय काय?

गुगलच्या स्मार्टफोनमधील Pixel 7 सिरीजवर जपानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पेटेंटचं उल्लंघन केलं म्हणून हा निर्णय घेतला.

Google Pixel 7 Ban : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलला जोरदार धक्का (Google Pixel 7 Ban in Japan) बसला आहे. गुगलच्या स्मार्टफोनमधील Pixel 7 सिरीजवर जपानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पेटेंटचं (स्वामित्व हक्क) उल्लंघन केलं म्हणून हा निर्णय घेण्यात (Japan News) आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या फक्त Pixel 7 या सीरिजवरच बंदी आहे. पण जर प्रकरण पुढे वाढलंच तर Pixel 8 आणि Pixel 9 सीरिजवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नेमकं काय प्रकरण आहे याची माहिती घेऊ या..

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर न्यायालयाच्या निर्णयानंतर Pixel 7 या सीरिजवर जपानने बंदी घातली आहे. कोर्टाने आपल्या निरीक्षणात गुगलला दक्षिण कोरियन कंपनी Pantech चे पेटंट उल्लंघनात दोषी मानलं आहे. पॅनटेक कंपनीने दोन दिवसांपूर्वीच खटला जिंकल्याची घोषणा केली होती. टोक्यो डिस्ट्रीक्ट कोर्टाने पेटेंट उल्लंघनामुळे गुगल पिक्सल 7 सीरिजवर बंदी घातली आहे. म्हणजेच आता गुगल पिक्सल 7 सीरिजमधील स्मार्टफोन जपानमध्ये विक्री करू शकणार नाही.

Pixel 8 आणि Pixel 9 चं काय होणार

पेटंटचं उल्लंघन केलं म्हणून एखाद्या उत्पादनावर जपानमध्ये बंदी घालण्यात आल्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. रिपोर्ट्सनुसार Pantech जवळ 4G कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीशी संबंधित एक पेटंट आहे. याच कारणामुळे न्यायालयाने गुगलच्या विरोधात निकाल दिला. या निर्णयानंत आता गुगलला पिक्सल 7 सीरिजमधील एकही फोन जपानमध्ये विकता येणार नाही.

तरुणांनो, नोकरीसाठी गुगल करणार मदत; जाणून घ्या गुगलचे 5 प्रमुख सर्टिफिकेट कोर्सेस

न्यायालयाचा हा निर्णय फक्त Pixel 7 सीरिजवर लागू राहणार आहे. परंतु, पॅनटेक कंपनी मात्र मोठ्या बंदीच्या प्रयत्नात आहे. याचा परिणाम गुगलच्या अन्य फोनवरही व्हावा असे कंपनीला वाटत आहे. म्हणजेच Pixel 8 आणि Pixel 9 सीरिज बॅन करण्याचे प्रयत्न या कंपनीकडून सुरू आहेत. जागतिक बाजारात सध्या Pixel 8 आणि Pixel 9 सीरिजमधील स्मार्टफोन्सची मागणी आहे.

कंपनीचं म्हणणं नेमकं काय?

Pixel 7 सीरिज आता तीन वर्ष जुनी झाली आहे. कंपनीने जपानी कस्टमच्या माध्यमातून आयात होणाऱ्या सर्व पिक्सल सीरिज फोनवर बंदी घालण्यासाठी अर्ज केला आहे. ETNews ने Pantech कंपनीच्या अधिकृत हवाल्याने ही माहिती दिली आहे की जपानच्या न्यायालयात गुगल सारख्या जागतिक कंपनीच्या विरोधात कारवाई करण्यात आली ही बाब निश्चितच प्रोत्साहित करणारी आहे.

आता जर या बंदीला जपानमध्ये आणखी विस्तार मिळाला तर गुगलला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागेल. गुगल लवकरच Pixel 10 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत या निर्णयाचा परिणाम नव्या डिव्हाइसवर पडला तर कंपनीला मोठं नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे गुगलला काही प्रमाणात नुकसान होईल असा अंदाज व्यक्त केल जात आहे.

Youtube च्या नियमांत मोठा बदल, लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी मुलांचं वय निश्चित; पालकांनाही जबाबदारी

follow us