Download App

VIDEO : मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदच्या साथीदाराची गोळ्या घालून हत्या…

मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईदचा(Hafiz Saeed) निकटवर्तीय साथीदार मुफ्ती कैसर फारुखची(Mufti Kesar Farukh) हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील एका धार्मिक स्थळाजवळ अज्ञात व्यक्तीने फारुखवर गोळ्या झाडल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.

मुफ्ती कैसर फारुख लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता होता. शनिवारी फारुख समनाबाद भागातील एका मशीदीपासून पायी चालत जात होता. त्याचवेळी अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या पाठीमागून गोळी झाडून त्याच्यावर गोळी झाडली. फारुकला पाठीत गोळी लागल्यानंतर तो खाली कोसळला.

कोकणात दोन वाघ आमने-सामने : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन रामदास कदम-भास्कर जाधव भिडले

फारुखवर गोळी झाडल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये लष्कर ए तोयबा संघटनेचा नेता फारुखला अज्ञात व्यक्तीकडून पाठीवर गोळीबार केला आहे. यामध्ये फारुख गोळी लागल्यानंतर खाली कोसळला असून गोळीबारानंतर इतर पायी जात असलेले नागरिक पळून जात असताना दिसून येत आहेत. मात्र, हा व्हिडिओ याचं घटनेचा आहे की नाही? याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

रमेश कदम यांच्या आरोपांवर भुजबळांचा पलटवार, ‘त्यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहीत नसेल’

दहशतवादी कैसरला काही दिवसांपासून लक्ष्य करण्यात येत होतं, स्थानिक अधिकारी या घटनेला हत्येचे प्रकरण मानत नसून घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी एधी सेंटरजवळील गुलशन-ए-ओमर मदरशाजवळ गोळीबार केला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गोळीबारात 30 वर्षीय कैसरसोबत फारुख शाकीरदेखील हा जखमी झाला आहे. जखमी शाकीरला अब्बासी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान, अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात भारताकडून अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मारले गेले आहेत. कैसर हा लष्कर प्रमुख हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. हाफिज सईदचा मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी येताच कराचीमध्ये लष्कराचा दहशतवादी कैसर मारला गेल्याची बातमी आली असल्याचं वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Tags

follow us