रमेश कदम यांच्या आरोपांवर भुजबळांचा पलटवार, ‘त्यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहीत नसेल’

रमेश कदम यांच्या आरोपांवर भुजबळांचा पलटवार, ‘त्यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहीत नसेल’

Chhagan Bhujbal On Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) आपण कसे दूर करु शकतो, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. रमेश कदम यांनी ब्लॅकमेल या शब्दाचा अर्थ माहीत नसेल, अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की मी आजारी होतो तर होतोच. आजारी नव्हतो असे वाटत असेल तर जे जे हॉस्पिटलमध्ये, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये. केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन कागदपत्रं तपासा मी किती आजारी होतो. ब्लॅकमेल कसं काय करणार? त्यात एक आहे की आपण लोकांची मदत मागत असतो. पक्षातील नेत्यांची मदत मागत असतो. त्यात चुक काय आहे? कदाचित ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ रमेश कदम यांना माहिती नसेल.

Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार

दरम्यान, रमेश कदम यांनी भुजबळांवर आरोप करताना म्हटले होते की तुरुंगामध्ये असताना छगन भुजबळ रोज अजारी पडायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण आताचे छगन भुजबळ फिट आहेत. तरुंगात असताना अजारी असल्याचे दाखवून लोकांची सहानुभूती मिळवायची, नेत्यांची मिळवायची, पक्षाची मिळवायची आणि जामीन घ्यायचा, अशा पद्धतीने त्यांनी केलं.

Eknath Shinde यांचे सीएमपद हिवाळी अधिवेशनापूर्वी जाऊ शकते!, शरद पवार गटाचा दावा

रमेश कदम पुढं म्हणाले होते की त्यांना वाटायचे की शरद पवार यांनी मदत केली पाहिजे, मदत मिळायला उशीर होतोय. त्याबद्दलची ते नाराजी बोलवून दाखवायचे. मला लवकर जामीन मिळाला नाही तर वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, अशा पद्धतीचे ब्लॅकमेल करताना आम्ही पाहिलेले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube