Download App

Turkey Attack: मोठी बातमी! तुर्कीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS वर दहशतवादी हल्ला

Turkey Attack: तुर्कीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी 'तुसास'च्या आवारात दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया

  • Written By: Last Updated:

Turkey Attack: तुर्कीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी ‘तुसास’च्या (TUSAS) आवारात दहशतवादी हल्ला (Turkey Attack) झाल्याची माहिती तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया (Ali Yerlikaya) यांनी दिली आहे. या दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक जण जखमी देखील झाले आहे. मात्र हल्ला का झाला आणि कसं झाला याबाबत गृहमंत्री अली येरलिकाया यांनी अधिक माहिती शेअर केलेली नाही.

गृहमंत्री अली येरलिकाया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याचा तपास करण्यात येत आहे. यापूर्वी देशात कुर्दिश अतिरेकी आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी यापूर्वी देशात हल्ले केले अशी माहिती त्यांनी दिली.

तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या शिफ्टमध्ये बदल करताना दहशतवादी आले आणि त्यापैकी एकाने बॉम्बचा स्फोट केला, तर इतर कंपाऊंडमध्ये दाखल झाले असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. तसेच घटनास्थळी गोळीबार सुरू असून काही कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे असा दावा देखील करण्यात येत आहे मात्र याबाबात तुर्की सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

विधानसभेसाठी मविआचा अधिकृत फॉर्म्युला ठरला; पत्रकार परिषदेत घोषणा

तर दुसरीकडे कॉम्प्लेक्समध्ये स्फोट झाल्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याचे यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. सध्या सुरक्षा दल, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले.

follow us

संबंधित बातम्या