Thaksin Shinawatra: थायलंडच्या (Thailand) सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा (Thaksin Shinawatra) यांना आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. परदेशात अनेक वर्षे निर्वासित राहिल्यानंतर थाक्सिन शिनावात्रा आज मायदेशी परतले. थाक्सिन शिनावात्रा आज सकाळी बँकॉकच्या (Bangkok) आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपल्या कुटुंबासह खाजगी जेटने पोहोचले होते. त्यानंतर काही वेळ माध्यमांशी संवाद साधला तसेच आपल्या समर्थकांची भेट घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने थाक्सिन यांना सत्तेचा गैरवापर आणि गैरव्यवहार अशा तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले होते. याशिवाय त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला विदेशी कर्जे देण्याचे बेकायदेशीरपणे आदेश दिले होते. त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे ‘शेअर’ दिले होते. मंगळवारी मायदेशी परतताच थाक्सिन यांना प्रथम सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले होते.
Onion Price Crisis : ‘शरद पवार 10 वर्ष कृषिमंत्री पण..,’ मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला
2008 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप
थाक्सिन शिनावात्रा यांना 2008 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली थायलंडच्या पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते. तेव्हापासून ते देशाबाहेर राहत होते.
अनेक दशकांपासून थायलंडच्या राजकारणावर प्रभाव
थाक्सिन हे अनेक दशकांपासून थायलंडचे सर्वात मोठे राजकीय नेते आहेत. देशाबाहेर असूनही त्यांचा राजकारणावर मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते. चुलालॉन्गकॉर्न युनिव्हर्सिटीचे राजकीय अभ्यासक थिटिनन पोंगसुधीरक यांच्या मते, “या निर्णयामुळे थाई राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय बंद होईल. गेल्या दोन दशकांपासून ते थायलंडमधील एक प्रमुख शक्ती आहेत.”
थायलंडमध्ये राहणाऱ्या ग्रामीण लोकांमध्ये थाक्सिनचा मोठा प्रभाव आहे. देशातील ग्रामीण लोकांचा असा विश्वास आहे की थाक्सिन हे बँकॉकच्या चमकदार जगाच्या पलीकडे राहणारे नेते आहेत आणि ते खेड्यात राहणाऱ्या लोकांचे हित जपतात.