Pragganananda : बुद्धीबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत पोहचणाऱ्या ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदचा खडतर प्रवास
Pragganananda Chess World cup 2023 : बुद्धीबळ या खेळाचं सगळा सार त्याच्या या नावातच आहे. आणि या खेळात खेळणारा खेळाडू हा कोणत्याही योगायोगाने नाही तर त्याच्या बुद्धीचातुर्य आणि तंत्रकौशल्याच्या जोरावरच जिंकत असतो. हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. बुद्धीबळ विश्वचषक 2023 ( Chess World cup 2023) मध्ये अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदाने (Pragganananda ).
धडाकेबाज तुकाराम मुंढे अडचणीत, नियमबाह्यपणे कंत्राट दिल्याचा ठपका
प्रज्ञानानंदाने फाईड विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करत रोमहर्षक विजय खेचून इतिहास रचला. तर अंतिम फेरीत त्याचा सामना नॉर्वेच्या विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे. मात्र वयाच्या जेम तेम 18 व्या वर्षी एवढी मोठी मजल मारणारा प्रज्ञानानंद इथपर्यंत पोहचला कसा? त्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता जाणून घेऊ…
प्रज्ञानानंदा रमेशबाबू याचा जन्म 2005 मध्ये तामिळनाडूच्या चेन्नईत झाला. त्याचे वडिल रमेशबाबू हे बॅंक कर्मचारी आणि आई नागलक्ष्मी गृहीणी आहे. मात्र वडिल पोलिओग्रस्त असल्याने घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यात त्याची मोठी बहिण वैशाली ही देखील बुद्धिबळपटू असून दोन वेळा युवा बुद्धिबळ चॅम्पियन आहे. त्यामुळे रमेशबाबूंना आपला मुलाने बुद्धिबळपटू होऊ नये असं वाटत होतं. कारण कुटुंबाला या दोघांचा खर्च परवडत नव्हता. मात्र बुद्धीबळाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं अन् बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत तो. बुद्धीबळ खेळायला लागला.
त्यानंतर वडिलांनी कर्ज काढून त्याच्या या मुलांच्या खेळाला त्यांच्य करिअर बनवण्यासाठी पैसा उभा केला. रमेशबाबूंनी त्यांना मार्गदर्शनही केलं. मुलं विविध स्तरावर स्पर्धांमध्ये खेळू लागली. जिंकू लागले. त्यांच्या घरात सगळीकडे मुलांनी जिंकलेले कप आणि पदकं आहेत. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्याने हा खेळ खेळायला सुरूवात केली. बुद्धीबळाची आवड वाढत गेली आणि प्रज्ञानानंदा दिवसातून ४-५ तास सराव करायला लागला. आणि दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टरही झाला होता. तर वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्याला ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळाला आणि भारतात ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरला. 2015 मध्ये चेन्नईत आलेले पुरात काही कप वाहून गेले होते. मात्र त्यातूनही प्रज्ञानानंदाने आपली विजयी घौडदौड सुरूच ठेवली.
आता पाहूयात प्रज्ञानानंदने मिळंवलेला ग्रँडमास्टर किताबाचं महत्त्व काय?
बुद्धीबळातील ग्रँडमास्टर म्हणजे पीएचडी मिळवण्यासारखं आहे. लहान वयात ती मिळवणं सोपंही नाही. बुद्धिबळ खेळात दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. खुल्या जिथे कुणीही पैसे भरून खेळू शकतं. तर काही निमंत्रितांच्या जिथे रेटिंग महत्त्वाचं ठरतं. तर क्रिकेट प्रमाणेच बुद्धिबळातही सुरुवात, खेळाचा मध्य आणि शेवट असे तीन भाग असतात. जर सुरुवातीला तुमचा खेळावर ताबा असेल तर शेवटही तुम्ही चांगला करता. याचं तत्वावर प्रज्ञानानंद इथवर पोहचला.
तसेच प्रज्ञानानंद आता ज्या टप्प्यावर आहे. तो म्हणजे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी जेथे त्याला पाच वेळा या स्पर्धेचा चॅंपियन राहिलेल्या नाॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनचा सामना करायचा आहे. कार्लसन स्वत: 13 वर्षांचा होता जेव्हा ग्रँडमास्टर झाला. मात्र जगातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टरने मॅग्नस कार्लसनला हरवलं आहे. त्यामुळे आता भारतीय बुद्धीबळपटू प्रज्ञानानंदला ही संधी मिळाली आहे. त्यात विजय मिळवत तो आणखी एक नवं रेकॉर्ड आपल्या नावे करू शकतो.