Kathmandu Airport : नेपाळमधील काठमांडू विमानतळावर फ्लाय दुबई विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना त्याला आग लागल्याची माहिती आहे. विमानतळावर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
काठमांडू विमानतळावरून दुबईला जात असताना उड्डाण घेताच विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे. हे विमान हवेतच घिरट्या घालत असून त्याच्या लँडिंगचे प्रयत्न सुरू आहेत. या विमानात 120 नेपाळी नागरिक तर 49 परदेशी प्रवासी असल्याची माहिती आहे.
काठमांडू विमानतळावरून दुबईला उड्डाण घेतल्यानंतर फ्लाय दुबईच्या विमानाला आग लागली आहे. त्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले की फ्लाय दुबई फ्लाइट 576 (बोईंग 737-800) सुरक्षितपणे उतरली. हे विमान काठमांडूहून दुबईला जात आहे. काठमांडू विमानतळाचे कामकाज आता पूर्वपदावर आले आहे.
केंद्रात सरकार आल्यास ‘जीएसटी’च हटवणार; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा
काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेत असताना कथितरित्या आग लागलेल्या दुबईच्या विमानाला आता दुबईला पाठवण्यात आल्याचे नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांचे म्हणणे आहे. दुबईला जाणाऱ्या या विमानात 20 नेपाळी आणि 49 परदेशी नागरिक होते.
त्रिभुवन विमानतळाचे प्रमुख प्रताप बाबू तिवारी यांचा हवाला देत सूत्रांनी सांगितले की, फ्लाय दुबईने फ्लाइट टेक ऑफ होताच आपत्कालीन स्थिती घोषित केली आणि आता त्याचे अहवाल सामान्य आहेत. दुबईला जाणाऱ्या विमानाचा आकाशात स्फोट होऊन आग लागली होती.