US China Tariff War : अमेरिकेने चीनच्या वस्तूंवर टॅरिफ आकारण्याचा आदेश दिला आहे. यानंतर चीननेही अमेरिकेला (US China Tariff War) जशास तसे उत्तर दिले आहे. चीन सरकारने ज्वारी, बीफ, जलीय उत्पादने, फळे, भाजीपाला आणि डेअरी उत्पादनांसह अनेक अमेरिकी वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली. रॉयटर्स न्यूज एजन्सीनुसार चीनी वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की येत्या 10 मार्चपासून काही अमेरिकी वस्तूंच्या आयातीवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त टॅरिफ आकारला जाणार आहे. दरम्यान, सत्तेत येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ आकारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ट्रम्प सरकारने अंमलबजावणील सुरुवात केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ 10 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. चीनकडून व्यापाराच्या आडून जी चालाखी केली जात आहे त्यास आळा घालण्यासाठी ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. फक्त चीनच नाही तर कॅनडा आणि मेक्सिकोवरही 25 टक्के टॅरिफ आकारला आहे. या निर्णयामुळे ट्रेड वॉरचा धोका वाढला आहे.
50 लाख डॉलर्स द्या अन् अमेरिकचे नागरिक व्हा डोनाल्ड ट्रम्पची खास योजना
अमेरिकेच्या या निर्णयाला उत्तर म्हणून आता चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर टॅरिफ आकारण्याची तयारी केली आहे. चीनच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेतील शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेतील शेतकरी वर्ग निर्यातीवर जास्त अवलंबून आहे. चीनमधील मोठ्या बाजारावर येथील शेतकरी अवलंबून आहेत. आता टॅरिफमुळे अमेरिकी वस्तूंच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे.
यामुळे किंमती कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही कमी होऊ शकते. जर हे व्यापार युद्ध दीर्घ काळ सुरुच राहिले तर अमेरिकी शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठा शोधणे कठीण होईल. तर चीनमध्येही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीन सरकारला या वस्तू ब्राझील, अर्जेंटीना किंवा अन्य देशांतून मागवाव्या लागतील.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे जगभरातच या युद्धाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या वादांमुळे जागतिक पुरवठा साखळी बाधित होण्याचीही भीती आहे. यामुळे वस्तूंच्या किंमतीत वाढ होऊन वैश्विक आर्थिक मंदीचे संकट निर्माण होऊ शकते. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ही स्थिती अतिशय धोकादायक आहे. जगातील सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्थांतील व्यापारात काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम अन्य देशांवर होऊ शकतात. कृषी व्यतिरिक्त मॅन्यूफॅक्टरिंग, टेक्नोलॉजी आणि ऑटोमोबाइल यांसारखे उद्योगही टॅरिफमुळे प्रभावित होऊ शकतात.
धडकी भरवणारी बातमी! चीनमध्ये नवा कोरोना व्हायरस, जनावरांतून माणसांत संसर्ग; जगात खळबळ