Elon Musk Trending Video : ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचा मालक एलन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असतो. आताही एका खास कारणामुळे तो चर्चेत आला आहे. मस्कने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अंतराळात सूर्यास्ताचे दृश्य दिसत आहे. केवळ विचार करूनच असे वाटत असेल की अंतराळातील ते दृश्य कसे दिसत असेल.
मस्कने हा अप्रतिम व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ मुळात स्पेसएक्स कंपनीच्या ऑफिशियल ट्विटर पेजवर ट्विट केला होता. तुम्ही सुर्यास्त होताना नेहमीच पाहता. त्यामुळे त्यात काही नवीन आहे असे आपल्याला वाटत नाही. सुर्यास्ताचा वेगळा अनुभव मिळावा यासाठी हौशीबहाद्दर लोक देश विदेशातील लोकप्रिय सनसेट पॉइंटवर जातात.
Stage separation at sunset, followed by second stage engine startup, and payload fairing deploy pic.twitter.com/QOecwdHx4s
— SpaceX (@SpaceX) May 2, 2023
मस्कने जो व्हिडीओ रिट्विट केला आहे तो पोस्ट करताना स्पेसएक्सने सुंदर कॅप्शनही लिहीले आहे. व्हिडीओसा रिशेयर करताना एलन मस्कने या व्हिडीओची माहिती देताना लिहीले आहे, की अंतरिक्षात सूर्यास्त.
हा खास व्हिडीओ 2 मे रोजी पोस्ट केला गेला होता. ट्विटरवर शेअर केल्यानंतर आतापर्यंत 2.5 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या प्रत्येक तासाला वाढतच चालली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 30 हजार लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.
सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाच्या किंमती 6 टक्क्यांनी घटणार…