Trump’s additional 100 percent tariff on China US stock market crashes, investors lose $1.5 trillion : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार टॅरिफ वाढवून जगभरातील देशांना जेरीस आणत आहेत. यामध्ये आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी चीनविरुद्ध टॅरिफचं हत्यार उगारलं आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून आता सर्व चिनी आयातीवर शंभर टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये बनणाऱ्या महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअरवर निर्यात नियंत्रण लागू करण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे.
ग्रहांची स्थिती परिणाम करणार, बाराही राशींसाठी कसा आहे? आजचा दिवस जाणून घेऊ
दरम्यान टॅरिफ वाढवण्याचं हे पाऊल उचललेलं असताना दुसरीकडे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापारी आणि राजनैतिक तणाव वाढला आहे. तेव्हा तज्ञांचे म्हणणे आहे की, टॅरिफ लागू झाला तर जागतिक बाजाराला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तर या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणुकदारांनी दीड लाख कोटी डॉलर्स गमावले आहेत.
Video : विधानसभा निवडणुकीत 20 हजार मतदान बाहेरुन आणलं; शिंदेचे आमदार हे काय बोलले?
या निर्णय बाबत ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, चीनमध्ये व्यापारामध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचा परिणाम सर्व देशांवर होत आहे. चीनने अनेक उत्पादनांवर निर्यात नियंत्रण करण्याच्या धोरण आखलं आहे. ज्यामुळे जागतिक बाजारात असंतुलन निर्माण होत आहे. त्यामुळे अमेरिकेने देखील चीनविरुद्ध आक्रमक पाऊल उचलत 1 नोव्हेंबरपासून शंभर टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात येणार आहे.
जामखेडमधील रेणुका कला केंद्रावर राडा ! नर्तकीने छेडछाडीची तक्रार दिला म्हणून जमावाचा कोयत्याने हल्ला
चीनने भूगर्भातून मिळणारे दुर्मिळ खनिजांची निर्मिती आणि त्याच्या निर्यातीवर नियंत्रण लावला आहे .ज्यामुळे धातू आणि इलेक्ट्रॉनिक्स ईव्ही बॅटरी यासारख्या उत्पादनांवर परिणाम होऊ शकतो. या कारणामुळेच अमेरिकेने चीनवर टॅरिफ हत्यार उगारलं आहे. असे देखील बोलले जात आहे.
नोबेल पुरस्कार नाकारल्याने व्हाईट हाऊसचा संताप; ट्रम्प यांच्या टीमकडून नोबेल समितीवर टीका
दरम्यान ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे विदेशी आयात करणाऱ्या वस्तूंची मागणी घटते. तसेच स्वदेशी वस्तूंमध्ये स्पर्धा वाढते. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या निर्णयाचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. अमेरिकेमध्ये वस्तू महाग होतील. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मोबाईल आणि इलेक्ट्रिक वाहन यासारख्या क्षेत्रातील वस्तूंच्या किंमती वाढतील. त्याचबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यातील सप्लाय चेनवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.