Trump’s No green card for obese, no entry to the US for diabetes and high blood pressure : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हापासून दुसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. तेव्हापासून त्यांनी अजब निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. ज्यामध्ये त्यांनी टॅरिप लावून अनेक देशांना वेठीस धरलं असताना त्यामध्ये त्यांनी आता मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी एक अजब फतवा काढला आहे. आता मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना अमेरिकेमध्ये एन्ट्री दिली जाणार नाहीये. ट्रम्प प्रशासनाने याबाबत दूतावास आणि वकिलातींना याबाबत आदेश जारी केले आहेत.
राहू कुंभमध्ये शनी मीन राशीमध्ये! बाराही राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या…
अमेरिकेमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना जर रक्तदाब किंवा मधुमेह असेल तर अशा लोकांना व्हिसा किंवा ग्रीन कार्ड दिला जाऊ नये. अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढत असल्याचं कारण देत हे निर्बंध लादण्यात आले आहेत. तर मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा असणाऱ्या लोकांनाही ग्रीन कार्ड दिलं जाऊ नये. अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कॅन्सर, श्वसनाचे विकार, मज्जा संस्थांचे आजार असणाऱ्या लोकांनाही अमेरिकेमध्ये आता मनाई असणार आहे.
ट्रम्प (Trump) यांची जगाला धडकी भरवणारी धमकी…
दरम्यान गेल्या दोन दिवासांपूर्वी ट्रम्प यांनी रशिया,चीन आणि उत्तर कोरिया हे राष्ट्र वारंवार अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे यामध्ये अमेरिका देखील मागे राहू शकत नाही. हे विधान सीबीएस न्यूजच्या लोकप्रिय शो सिक्सटीन मिनिट्स यामध्ये इंटरव्यू देताना केला आहे. आमच्याकडे इतकी अण्वस्त्र शक्ती आहे की,आम्ही जगाला दीडशे वेळा उद्ध्वस्त करू शकतो.रशिया, चीन यांच्याकडे देखील मोठी अण्वस्त्र शक्ती आहे.मात्र अमेरिका एकटा असं देश आहे.जो अण्वस्त्र चाचणी करत नाही.त्यामुळे हे चालणार नाही.अमेरिका देखील संयम राखण्याची नीती अवलंबू शकत नाही.
