अखेर ठरलं! ‘या’ दिवशी एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा देणार

नवी दिल्ली : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलेय. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होती. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत नेटकऱ्यांना विचारलं होतं की, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी […]

Elon Musk Twitter 2

Elon Musk Twitter 2

नवी दिल्ली : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलेय. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होती. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत नेटकऱ्यांना विचारलं होतं की, ‘मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.’ मस्क यांच्या या ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी सीईओपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय.

ट्विटरच्या सीईओ पदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही घोषणा केली. एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचे सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडताच मी लगेच राजीनामा देईन. त्यानंतर मी फक्त सॉफ्टवेअर चालवेल आणि सर्व्हर टीमच्या कामकाजावर लक्ष ठेवेन.

एलॉन मस्क यांनी 19 डिसेंबरला सकाळी ट्विटरवर पोल करत विचारलं होतं की, मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन. या पोलवर 57.5 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा द्यावा यासाठी मतदान केल्याचं पाहायला मिळालं. तर 42.5 टक्के लोकांच्या मते मस्क यांनी राजीनामा देऊ नये. एका अहवालानुसार एलॉन मस्क ट्विटरच्या नवीन सीईओच्या शोधात आहेत. ट्विटर पोलनुसार, मस्क यांनी सीईओ पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे.

Exit mobile version