Twitter : ज्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर आधीपासून ब्लू टिक आहे, त्यांच्या ब्ल्यू टिक लवकरच हटवल्या जाणार आहेत. मस्कच्या आगमनापूर्वी, ट्विटर सेलिब्रिटी, राजकारणी, पत्रकार इत्यादींच्या खात्यांची पडताळणी केली जायची आणि व्हेरियफेकेशन करून ब्ल्यू टिक दिली जायची. मात्र, आता सरसकट कोणीही या ब्ल्यू टिकचा वापर करू शकत नाही. ज्यांना ब्ल्यू टिक पाहिजे त्यांना आता पैसे मोजावे लागणार.
भारतासह इतर 15 देशातील ट्विटर युजरनां ब्लू टिकसाठी आता व्हेरिफिकेशनची गरज नाही. जर तुम्हाला तुमच्या ट्विटर प्रोफाइलवर ब्ल्यू टिक हवी असेल तर महिना किंवा वार्षिक पॅकेज घ्यावे लागणार. काही वापरकर्ते यात एलॉन मस्कच्या निर्णयाला पाठिंबा देताना दिसले.
एका वापरकर्त्याच्या म्हणण्यानुसार, “व्हेरिफिकेशन बॅच केवळ वापरकर्ते असल्याचा दावा करतात याची पुष्टी करण्यासाठी आहे. मला ते आधी आवडले नाही, पण आता निदान चेकमार्क बघून मला कळेल की मी खऱ्या युजरशी बोलत आहे की खोट्या..” Twitter ब्ल्यू भारतात ६५० रुपये/महिना आणि Android/iOSसाठी ९००/महिना पैसे द्यावे लागणार.
जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी ट्विटर ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पडताळणीनंतर यूजर्सना प्रोफाइलवर निळा चेकमार्क मिळतो. यापूर्वी केवळ सेलिब्रिटी आणि निवडक वापरकर्त्यांना ब्लू टिक्स मिळत असत. अशा परिस्थितीत, मस्कच्या सिग्नलनंतर, पेड सबस्क्रिप्शनशिवाय वापरकर्त्यांसाठी ब्लू टिक गायब होण्याचा धोका वाढला आहे.
Nana Patole : काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, भाजपकडून बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोप
मस्कला टॅग करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, “प्रिय एलोन मस्क ब्लू व्हेरिफिकेशन मार्क आता विनोद बनला आहे. पूर्वी ब्लू टिक व्हेरिफिकेशन फक्त सार्वजनिक व्यक्ती आणि राजकीय व्यक्तींना दिले जायचे पण आज टॉम, डिक आणि हॅरी (कुणीही) यांची पडताळणी केली जाते. तुमच्या पडताळणी टिकने त्याचे आकर्षण गमावले आहे. यावर ट्विटरच्या बॉसने उत्तर दिले, “लेगसी ब्लू चेक लवकरच काढले जातील कारण तेच खरे बनावट आहेत.”
यामुळे ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी सरसकट ट्विटर प्रोफाइलवरून ब्लू टिक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे आधीपासून ब्लू टिक असणारे ट्विटर युजर नाराज झाले आहेत. परंतु हे गरजेचं असल्याचं एलॉन मस्क सांगतात.