Download App

एक व्हॉट्सअप मेसेज अन् मंत्रिपदच गेलं, ब्रिटीश PM स्टार्मर यांची कारवाई, काय घडलं?

ब्रिटनचे आरोग्यमंत्री अँड्र्यू ग्वेने यांना फक्त एक व्हॉट्सअप मेसेजमुळे मंत्रिपद गमवावं लागलं आहे.

Britain News : ब्रिटनचे आरोग्यमंत्री अँड्र्यू ग्वेने यांना फक्त एक व्हॉट्सअप मेसेजमुळे मंत्रिपद गमवावं लागलं आहे. आता ही बातमी ऐकताना थोडी आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आरोग्यमंत्री ग्वेने यांना निलंबित केलं आहे. इतकेच नाही तर त्यांना लेबर पार्टीतूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यानंतर स्पष्टीकरण देत ग्वेने यांनी सांगितले की त्यांच्या मेसजचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अँड्र्यू ग्वेने यांनी सोशल मीडियावर यहुदी विरोधी पोस्ट केली होती. याशिवाय त्यांचे काही मेसेज भडकावू आणि यहुदी विरोधी होते. यानंतर यहुदी धर्मियांनी विरोध केला होता. मंत्री ग्वेने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. लोकांच्या या विरोधाची दखल घेत पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी कठोर निर्णय घेतला. ग्वेने यांना मंत्रि‍पदावरून बरखास्त करण्यात आले.

श्रीमंत ब्रिटिशांना दुबईची भुरळ! आपल्याच सरकारच्या ‘या’ धोरणामुळे सोडताहेत देश 

या कारवाईनंतर ग्वेने यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले. मी केलेल्या चुकीच्या टिप्पणीचा मला खेद होतोय. मी जे काही केलं ते चुकीचं होतं. त्यामुळे मी माफी मागतो. पंतप्रधान आणि पार्टीने माझ्याबाबत काय निर्णय घेतला याची मला पूर्ण जाणीव आहे.

अँड्र्यू ग्वेने यांनी मंत्रि‍पदासह पक्षातूनही निलंबित करण्यात आले आहे. लेबर पार्टीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की पक्षाचे नियम आणि प्रक्रियांनुसार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये केल्या गेलेल्या टिप्पण्यांची चौकशी केली जात आहे. गाइडलाइनच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याीही नेत्याला सोडलं जाणार नाही. येथून पुढे सुद्धा कोणत्याही नेत्याने पक्षाच्या  धोरणाविरुद्ध काम केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात कोणताही संकोच ठेवला जाणार नाही.

सर्वात मोठी बातमी! अमेरिका आणि ब्रिटनकडून येमेनची राजधानी सानावर हल्ला

follow us