श्रीमंत ब्रिटिशांना दुबईची भुरळ! आपल्याच सरकारच्या ‘या’ धोरणामुळे सोडताहेत देश…

श्रीमंत ब्रिटिशांना दुबईची भुरळ! आपल्याच सरकारच्या ‘या’ धोरणामुळे सोडताहेत देश…

British citizens settle in Dubai : आजमितीस ब्रिटनमध्ये अनेक लोक देश सोडण्याचा विचार (British Citizens) करत आहेत. देशातील लेबर पार्टीच्या सरकारने 225 वर्षे जुन्या नॉन डॉम टॅक्स पॉलिसीला रद्द करण्याचा विचार सुरू केला आहे. या पॉलिसीनुसार विदेशात राहणारे व्यक्ती त्यांच्या विदेशातील कमाईवर ब्रिटनमध्ये टॅक्स देत नव्हते. याबरोबरच पुढील महिन्यातील बजेटमध्ये कॅपिटल गेन, उत्तराधिकार आणि पेन्शनवर करात वाढ  (Britai Tax Policy) करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोकांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. सार्वजनिक सेवांच्या दर्जात घट, महागाई आणि खासगी शाळांच्या फी मध्ये भरमसाट वाढ या कारणांमुळे लोक विदेशात जाऊन स्थायिक होत आहेत.

युकेची टॅक्स पॉलिसी ठरतेय अडचणीची

युकेमध्ये सध्या सरकार टॅक्स पॉलिसी अधिक कठोर करण्यावर भर देत आहे. त्यामुळे देशातील अनेक श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोक दुसऱ्या देशात सेटल होण्याचा विचार करत आहेत. कार वाचविण्यासाठी ब्रिटन वर्जिन आयलंड्स, जर्सी आणि जिब्राल्टर सारखी ठिकाणे लोकप्रिय होत आहेत. तरीही राहण्याचा खर्च, जीवनशैली आणि रोजगाराच्या संधी यांचा विचार करून लोक आणखी दुसऱ्या ठिकाणांचा विचार करू लागले आहेत.

Britain news : ब्रिटनमध्ये राहता वरून नावं ठेवता; सुनक यांनी ब्रिटनमधील स्थलांतरितांना सुनावलं

ब्रिटिश नागरिकांची पहिली पसंत दुबई

जगभरातील श्रीमंत लोकांसाठी दुबई पहिल्या क्रमांकाचं (Dubai) शहर ठरत आहे. अनेकांचा ओढा दुबईकडेच असल्याचे दिसत आहे. दुबईत सध्या 2 लाख 40 हजार ब्रिटिश नागरिक राहत आहेत. दुबईची शून्य आयकर निती आणि दहा वर्षांचा स्वनूतनीकरण गोल्डन व्हिजा कार्यक्रम यांमुळे जगभरातील लोक या शहराकडे आकर्षित होत आहेत. या व्हीजामुळे फक्त राहण्याचाच अधिकार मिळत नाही तर तुम्ही येथे संपत्ती देखील खरेदी करू शकता.

युरोपातही अनेक चांगले पर्याय

ज्या लोकांना युरोपात स्थायिक व्हायचं आहे त्यांच्यासाठी अनेक चांगले पर्याय येथे उपलब्ध आहेत. ब्रिटिश नागरिकांना युरोपात स्थायिक होण्यासाठी एक ठराविक पेन्शन, गुंतवणूक उत्पन्न किंवा तरल संपत्ती (बँक खाते किंवा शेअर) दाखवण्याची गरज असते. तसेच बहुतांश युरोपीय देशांमध्ये खासगी आरोग्य विमा (Health Insurance) घेणे देखील बंधनकारक आहे. पोर्तुगाल अजूनही ब्रिटिश नागरिकांसाठी एक चांगला पर्याय आहे. येथे आता गोल्डन व्हिजा अंतर्गत (Golden Visa) संपत्ती खरेदी करण्याच्या अटींमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्याबद्दल A टू Z गोष्टी जाणून घ्या एका क्लीकवर 

विदेशात स्थायिक होण्याची प्रक्रिया

दुबई किंवा युरोपात एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर यासाठी एक चांगली योजना तयार करा. दुबईत तुम्ही 183 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास तुम्हाला तेथील संपत्ती किंवा उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. जर तुम्ही दुबईत स्वतः चा व्यवसाय सुरू केला तर हा तुमच्यासाठी तेथे राहण्याचा आणि कार्य परवानगी मिळवण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो.

जे लोक युरोपात स्थायिक होण्याचा विचार करत आहेत त्यांना व्हीजा नूतनीकरना दरम्यान आर्थिक स्थिती स्पष्ट करावी लागते. पहिल्या पाच वर्षांत दोन ते तीन वेळा असे करावे लागते. तरीही विदेशात स्थायिक होण्याचा निर्णय तुमची आर्थिक स्थिती, जीवनशैली आणि व्यक्तिगत गरजा यांवर अवलंबून असेल. दुबईतील झिरो टॅक्स पॉलिसी आणि चांगल्या जीवनशैली या कारणांमुळे पहिल्या क्रमांकावर आहे. तर युरोपातील देशही तुम्हाला राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करून देतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube