Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्याबद्दल A टू Z गोष्टी जाणून घ्या एका क्लीकवर…
Anant Ambani and Radhika Merchant Wedding Schedule: देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेले, नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता यांचा धाकटा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) याच्या लग्नाची चर्चा गेल्या काही काळापासून होत आहे. अनंत आणि त्याची भावी पत्नी राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन यावर्षी मार्चच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरमध्ये झाले. (Anant Radhika Wedding) यानंतर, दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशनमे महिन्याच्या शेवटच्या आठवड़्यात एका आलिशान क्रूझवर इटली या ठिकाणी पार पडले. आता शानदार विवाहसोहळाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या…
View this post on Instagram
5 ते 14 जुलै दरम्यान कोणते कार्यक्रम होणार
प्रथम अंबानी कुटुंबाने 50 जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित केला आणि नंतर मेमारू समारंभ अँटिलियामध्ये पार पडला. हे फंक्शन्स 3 जुलैपासूनच सुरू झाले होते. 12 जुलै रोजी दोघेही सात फेरे घेतील आणि उर्वरित विधी 14 जुलैपर्यंत पार पडतील. दोन प्री-वेडिंग फंक्शन्सनंतर या जोडप्याचे मुंबईतच भव्य लग्न होणार आहे.
अशा परिस्थितीत नीता अंबानी यांच्या लहानग्या अनंत अंबानीशी लग्न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता, अशा परिस्थितीत 5 जुलैपासून लग्नाआधीचा भव्य सोहळा सुरू होत आहे. शुक्रवारी रात्री एक संगीत सेरेमनी आहे ज्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टार जस्टिन बीबर देखील भारतात आला आहे. या संगीत सोहळ्याला बॉलीवूडचे लोकही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
पूजेबद्दल बोलायचे झाले तर 8 जुलै रोजी कुटुंबात गृहपूजा होणार आहे. या कार्यक्रमाला फक्त कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर 10 जुलै रोजी शिवपूजा होणार आहे, जी जोडप्याला नवीन आयुष्याच्या सुरुवातीच्या शुभेच्छा देण्यासाठी ठेवण्यात आली आहे. त्याच रात्री एक पार्टी देखील ठेवण्यात आली आहे.
लग्नाबाबत बोलायचे झाले तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न अँटिलियामध्येच होणार आहे. येथेच शुभविवाह होणार आहे. यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याला मिनी रिसेप्शन म्हटले जात आहे. नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे होणार आहे. त्यानंतर 14 जुलैलाही येथे फायनल रिसेप्शन होईल, ज्यामध्ये बॉलिवूडच्या सर्व लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
3 जुलै – ममरू आणि गरबा रात्री. 5 जुलै – संगीत सोहळा 8 जुलै – गृहपूजा, 10 जुलै दिवशी शिवपूजा आणि रात्री यंगस्टर्स पार्टी, 12 जुलै – शुभ विवाह, 13 जुलै – मिनी रिसेप्शन आणि 14 जुलै रोजी दुसरा रिसेप्शन ठेण्यात आले आहे.