Anant-Radhika Wedding: घरी येणार नवी नवरी! अनंत-राधिकाच्या लग्न फंक्शनला सुरुवात; संगीतपासून ते गेस्टपर्यंत सर्व …

Anant-Radhika Wedding: घरी येणार नवी नवरी! अनंत-राधिकाच्या लग्न फंक्शनला सुरुवात; संगीतपासून ते गेस्टपर्यंत सर्व …

Anant Radhika Wedding: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) लग्न करणार आहे. अनंत आणि राधिका मर्चंटच्या (Radhika Merchant) लग्नापूर्वी अंबानी कुटुंबाने (Anant Radhika Wedding) 50 गरीब जोडप्यांच्या लग्नाचे आयोजन केले होते. या सामूहिक विवाहाचे आयोजन अंबानी परिवाराने अतिशय थाटामाटात केले होते. सामूहिक विवाह पार पडल्यानंतर आता आजपासून राधिका-अनंतच्या लग्नाच्या सोहळ्यांना सुरुवात होणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Merchant ✨ (@radhika.merchant_)


अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा विवाह 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. लग्नाचे सोहळे तीन दिवस चालणार आहेत. सामूहिक विवाहानंतर नीता अंबानी म्हणाल्या की, यासोबतच घराघरात लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मुंबईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या पालघरमध्ये सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात अंबानी कुटुंबाने प्रत्येक नवविवाहित जोडप्याला सोन्याचे मंगळसूत्र, वेडिंग रिंग आणि नोज पिनसह कानातले पाठवले. तसेच चांदीचे दागिने जसे की पायाची अंगठी आणि पायल. तसेच एक लाख रुपयांचा धनादेश शगुन म्हणून देण्यात आला.

ही फंक्शन्सची यादी

अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या फंक्शन्सबद्दल बोलायचे तर ते 12 जुलैपासून सुरू होणार आहेत. 12 जुलै रोजी शुभ विवाह होणार आहे. त्यानंतर 13 जुलै हा शुभ आशीर्वादाचा दिवस असेल. या दिवशी लोक नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी येतील. यानंतर 14 जुलै रोजी मंगल उत्सव किंवा लग्नाचे स्वागत समारंभ होणार आहे. या तीन दिवसांत जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती या सोहळ्याला येणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नात बॉलिवूडसोबतच हॉलिवूड स्टार्सही परफॉर्म करणार आहेत.

Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन

प्री-वेडिंग फंक्शनमध्ये खळबळ

काही काळापूर्वी अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन झाले होते. ज्यामध्ये रिहानाने परफॉर्म केले. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही परफॉर्म केले. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनीही पहिल्यांदा एकत्र परफॉर्म केले. तिन्ही खानांना एकत्र पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज