Russia Ukraine War : दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) अजूनही थांबलेले नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आताही रशियाचा तिळपापड करणारी एक घटना घडली आहे. अमेरिकेसह नाटो संघटनेच्या (NATO) सदस्य देशांनी एक मागणी केली आहे ज्यामुळे रशिया संतापला आहे.
जर पश्चिमी देशांनी युक्रेनची मागणी मान्य (Ukraine) केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी (Vladimir Putin) दिला आहे. युक्रेनने मागणी केली आहे की आर्थिक निर्बंध तत्काळ हटवण्यात यावेत. जेणकरून पश्चिमी देशांकडून मिळणारी हत्यारे घेऊन रशियावर हल्ला करता येईल.
डोनाल्ड ट्रम्पना झटका! हश मनी प्रकरणात दोषी; अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
युक्रेनच्या या मागणीवर चर्चा करण्यासाठी नाटो संघटनेच्या विदेश मंत्र्यांची बैठक चेक गणराज्याची राजधानी प्राग येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. याआधी युक्रेनला हत्यारे देताना अशी अट टाकण्यात आली होती की या हत्यारांचा वापर रशियाच्या हद्दीत केला जाणार नाही. हे निर्बंध मागे घेण्याची मागणी युक्रेनकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. या हत्यारांचा वापर केला गेला तर युद्ध आणखी भडकू शकते अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. जर असं काही घडलं तर रशिया नाटो देशांवर आक्रमण करण्यासही मागे पुढे पाहणार नाही.
अमेरिकेप्रमाणेच जर्मनी सुद्धा या हत्यारांचा वापर रशियन हद्दीत करण्यास अनुकूल नाही. परंतु सध्याची बदललेली परिस्थिती पाहता नाटो आपल्या या निर्णयाचा फेरविचार करण्यास तयार झाला आहे. ही बैठक सुरू होण्याआधी नाटो संघटनेचे प्रमुख जेम्स स्टोलटेनबर्ग यांनी सांगितले की आता या निर्णयावर विचार करण्याची वेळ आली आहे.
याआधी फ्रान्सचे राष्ट्रपती इमेनुएल मॅक्रो यांनी सांगितले होते की युक्रेनला रशियातील त्या ठिकाणांना नष्ट करण्याची परवानगी दिली पाहिजे ज्यांचा वापर युक्रेनवर हल्ला करण्यासाठी केला जात आहे. जर्मनीचे चांसलार ओलाफ स्कोल्ज यांनी मात्र इमॅन्युएल मॅक्रो यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. युक्रेनला मर्यादेत राहूनच युद्ध लढले पाहिजे असे त्यांनी सांगितले. जर्मनीने युक्रेनला रशियावर आक्रमण करण्यासाठी कोणतेही हत्यार दिलेले नाही.
Melinda French Gates : महिलांच्या हक्कांसाठी मेलिंडा फ्रेंच गेट्स $1 अब्ज रुपये देणार
युक्रेनला रशियावर हल्ला करण्यासाठी आपल्या हत्यारांचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. विदेश मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी मात्र नव्या परिस्थितीत अमेरिका आपल्या जुन्या धोरणात बदल करू शकतो असे म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात रशियाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.