Download App

निराशाजनक अन् विनाशकारी…; मोदी पुतिन भेटीनंतर खास मित्र नाराज; व्यक्त केल्या तीव्र भावना

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.

  • Written By: Last Updated:

Ukrainian President Volodymyr Zelenskyy On PM Modi And Vladimir Putin  Meeting : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता मोदींचा खास मित्राने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही भेट म्हणजे “शांतता प्रयत्नांना प्रचंड आणि विनाशकारी” असल्याचे युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy ) यांनी म्हटले आहे. युक्रेन  आणि रशियातील युद्धादरम्यान भारताने युक्रेनच्या बाजूने मत व्यक्त केले होते. तसेच हे युद्ध थांबवण्यासाठीदेखील महत्त्वाची भूमिका निभावली होती. मात्र, ज्या रशियाने युक्रेनवर भीषण हल्ले करत लाखो लोकांचे जीव घेतले त्याच राष्ट्राला आणि राष्ट्राध्यक्षासोबत मोदींनी भेट घेतली आहे.

Video: प्रिय मित्र, वेलकम; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून दिलखूलास स्वागत

पुतिन मोदी भेट अन् कीवमध्ये रूग्णालयावर हल्ला

झेलेन्स्की म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्षांमध्ये कीवमध्ये ज्यावेळी मुलांच्या रूग्णालयावर हल्ला झाला ज्यात 20 लोकांचा मृत्यू झाला. यादिवशी या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणे हे निराशाजनक आणि विनाशकारी असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी सोमवारी (दि.8) मॉस्कोला पोहोचण्यापूर्वी, रशियाने राजधानी कीव, नीपर, क्रिव्ही रिह, स्लोव्हियान्स्क आणि क्रॅमतोर्स्कसह युक्रेनियन शहरांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले केले, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

Mirzapur 4: मिर्झापूर सीझन 4 मध्ये ‘या’ पाच कलाकारांचा पत्ता कट? खरं कारण आलं समोर

मोदी- पुतिन भेटीवर अमेरिकेनेही व्यक्त केली नाराजी  

एकीकडे झेलेन्स्की यांनी मोदी आणि पुतिन भेटीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त  केली आहे. त्याप्रमाणे अमेरिकेनेदेखील नाराजी व्यक्त केली आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत चिंता व्यक्त केली.रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचा, युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे असेही मिलर म्हणाले.

follow us