America Attacke On Sanaa : एकीकडे इस्राइलकडून (Israel) हिजबुल्लाहवर (Hezbollah) हवाई हल्ले सुरु असताना काही दिवसापूर्वी इराणने (Iran) इस्राइलवर मिसाईल हल्ला केल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली होती. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार अमेरिका आणि ब्रिटनकडून येमेनवर (Yemen) हवाई हल्ले करण्यात येत आहे.
रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका (America) आणि ब्रिटनने (Britain) येमेनची राजधानी साना (Sanaa) आणि होदेइदाह विमानतळासह (Hodeidah airport) येमेनच्या अनेक भागांवर हल्ले केले आहे. तसेच हुथी बंडखोरांनी दावा केला आहे की धमार शहराच्या दक्षिणेकडील भागाला अमेरिका आणि ब्रिटनकडून टार्गेट करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे अल जझीराच्या वृत्तानुसार, आतापर्यंत सनामध्ये चार हवाई हल्ले झाले आहे तर होदेइदाह विमानतळावर आणि याच्या वायव्येकडील भागात सात हवाई हल्ले झाले आहे तसेच धामर शहराच्या दक्षिणेस हवाई हल्ला झाला असा दावा अल जझीराच्या वृत्तात करण्यात आला आहे. इराण-समर्थित हुथी बंडखोर इस्रायल-हमास युद्धादरम्यान पॅलेस्टिनींशी एकता दाखवत गेल्या नोव्हेंबरपासून येमेनमधील आंतरराष्ट्रीय जहाजांवर हल्ले करत आहे.
🔊 U.S.-British Strike on Sanaa, Yemen
Reports are emerging of a joint U.S.-British airstrike targeting Sanaa, Yemen. Further details on the operation are awaited.
🇮🇱 Israel News Pulse 🇮🇱 pic.twitter.com/GqyXWUnVGc
— Israel News Pulse (@israelnewspulse) October 4, 2024
देवेंद्र फडणवीस अडचणीत, ‘व्होट जिहाद’ प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार
हुथी बंडखोरांनी 21 ऑगस्ट रोजी लाल समुद्रात ब्रिटिश तेल टँकरवर हल्ला केला होता तसेच या हल्ल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर हुथी बंडखोरांनी व्हायरल केला होता. माहितीनुसार हा हल्ला होदेइदाह बंदरापासून 110 किमी (70 मैल) अंतरावर करण्यात आला होता.
मंगळवारी हुथी बंडखोरांनी पनामा ध्वजांकित तेल टँकरला टार्गेट केले होते.याबाबात दुसऱ्या जहाजाच्या कॅप्टनने माहिती दिली आहे. तर अमेरिकेच्या नौदलावर देखरेख करणाऱ्या केंद्राने सांगितले की, जहाजाला टार्गेट करून मिसाईल डागण्यात आली होती मात्र ती चुकली. येमेनच्या इराणशी संलग्न हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच इराण समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला होता. या मिसाईल हल्ल्यासमोर आयर्न डोम आणि इतर हवाई संरक्षण यंत्रणा कुचकामी ठरली होती.
उमेदवारी न बदलल्यास…, इशारा देत मुंडे व दौंड यांनी राजळेंविरोधात थोपटले दंड