Download App

Todya Voting In US: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान; ट्रम्प-हॅरीस यांच्यात अटीतटीची लढाई

या निवडणुकीत अमेरिकेचा ४७ वा अध्यक्ष कोण होणार, हे निश्चित होणार आहे. मतदानाची उलटगणती सुरू असताना ट्रम्प यांनी ‘२०२०मध्ये मी व्हाइट हाऊस

  • Written By: Last Updated:

US Presidential Election : जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मंगळवार (दि. ५ नोव्हेंबर)रोजी मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार तसेच विद्यामान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही लढत अत्यंत अटीतटीची झाली आहे. (US Election) या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचं भाकीत राजकीय पंडितांना करता आलेलं नाही.

Donald Trump : मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि.. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॉडेलचा गंभीर आरोप

या निवडणुकीत अमेरिकेचा ४७ वा अध्यक्ष कोण होणार, हे निश्चित होणार आहे. मतदानाची उलटगणती सुरू असताना ट्रम्प यांनी ‘२०२०मध्ये मी व्हाइट हाऊस सोडायलाच नको होतं. आम्ही खूप चांगले प्रयत्न केले होते’, असे विधान केले आहे. २०२०मधील निवडणुकीनंतर जो बायडेन अध्यक्ष झाले. ट्रम्प यांनी मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आणि न्यायालयात आव्हान दिलं होते.

‘कॅपिटॉल हिल’ इमारतीबाहेर ट्रम्प समर्थकांनी दंगलही घडविली होती. हॅरिस यांनी ट्रम्प यांच्याविरोधात टीकेची राळ उडवली आहे. मिशिगन येथे प्रचाराचा शेवट करताना त्यांनी ‘सर्व अमेरिकी नागरिकांची मी अध्यक्ष असेन’, असे विधान केले. ‘द्वेष आणि विभाजन’ यावर अमेरिकींनी आता व्यक्त होण्याची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत जोरदार प्रचाराचा धुराळा उडाला होता.

डेमोक्रेटिक प्रचाराचे मुद्दे

समानता, बंधुता
मूलभूत स्वातंत्र्य
घटनात्मक मूल्ये, महिलांचे हक्क
गाझा पट्टीतील संघर्षविराम

रिपब्लिकन प्रचाराचे मुद्देे

अमेरिकेची अर्थव्यवस्था
बेकायदा स्थलांतरित
बायडेन प्रशासनाची धोरणे
जगभरातील हिंदूंचे रक्षण

follow us