Download App

अमेरिकेकडून चीनवर 104 टक्के टॅरिफ! भारताला तोटा होणार की फायदा? जाणून घ्या…

US कडून चीनवर104 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याचा भारतावर काय परिणाम होणार आहे. तसेच जगाला याचा फायदा होणार की तोटा जाणून घेऊ सविस्तर...

US imposes 104 percent tariff on China! Will India lose or gain? Find out : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे (Donald Trump) हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क ( tarrif) लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. त्यात आता अमेरिकेकडून चीनवर आणखी मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात आला आहे. चीनवर 104 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याचा भारतावर काय परिणाम होणार आहे. तसेच जगाला याचा फायदा होणार की तोटा जाणून घेऊ सविस्तर…

भारतावर काय परिणाम होणार?

अमेरिका आणि चीनमधील या युद्धाबाबात जगभरात चिंता निर्माण झाली आहे. कारण जगाभरात चीन हा मोठा पुरवठा करणारा देश आहे. त्यामुळे अमेरिकेने चीनवर टॅरिफ लावल्याने त्याचा भारत आणि जगावर देखील परिणाम होणार आहे. तसेच अमेरिकेला देखील याचा फटका बसणार आहे. भारतावर या कराचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होणार आहेत.

EPFO कडून मोठी घोषणा! आता चेहरा दाखवून UAN नंबर तयार होणार…

भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयात करतो. ज्यामध्ये विमान, त्याचे इंजिन, दागिने-रत्न, इलेक्ट्रॉनिक उत्पादन तसेच ऑटो क्षेत्राशी निगडीत वस्तू यांचा समावेश आहे. तर अमेरिकेला या सर्व वस्तू बनवण्यासाठी लागणारे दुर्मिळ खनिज लिथियम, स्कॅंडियम हे चीनवरून आयात करावे लागतात. त्यामुळे जर अमेरिकेच्या टॅरिफमुळेचीनची निर्यात 104 टक्के आयात शुल्काने होणार असेल तर अमेरिकेला लागणारी दुर्मिळ खनिज महाग होतील. त्यामुळे भारताला अमेरिकेकडून मिळणाऱ्या वस्तू महाग होतील परिणामी भारताला अमेरिकेकडून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी महाग होतील. अशी ही साखळी असल्याने अमेरिकेकडून चीनवर 104 टक्के टॅरिफ लावल्याचा प्रत्यक्ष नाही मात्र अप्रत्यक्ष परिणाम भारतावर आणि जगावर देखील होणार आहे.

खुशखबर! गोल्ड लोन EMI मध्ये फेडता येणार, बॅंकांच्या मनमानीला चपराक बसणार; RBI चा प्लॅन काय?

मात्र याच टॅरिफचा फायदा देखील आहे. तो म्हणजे केडिया सिक्युरिटीजचे निर्देशक आणि रिसर्च हेड अजय केडिया यांनी सांगितले की, अमेरिकेकडून चीनवर 104 टक्के कर लावल्याने चीनच्या वस्तू अमेरिकेत दुप्पट महाग होतील. तर भारतावर चीनपेक्षा कमी कर असल्याने भारताच्या वस्तू अमेरिकेत चीनच्या तुलनेत 75% स्वस्त होतील. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर याचा फार वाईट वाईट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

चीनवर काय परिणाम होणार?

तज्ज्ञ सांगतात की, या व्यापार युद्धाचा परिणाम चीनच्या जीडीपीवर होणार आहे. चीन हा अमेरिकेचा मोठा निर्यातदार आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिक चीनच्या वस्तू महाग झाल्यास दुसऱ्या स्वत: च्या देशातील कींवा इतर देशातील वस्तू खरेदी करतील. तर अमेरिकन कंपन्या या चीन ऐवजी इतर कमी टॅरिफ असलेल्या देशांतून कच्चा माल आयात करतील त्यामुळे चीनला मोठा फटका बसेल. चीनला मंदीचा सामना करावा लागेल. तर गोल्डमॅन सॅक्स आणि बीएनपी पॅरिबासनुसार चीनचा जीडीपी विकास दर 2025 मध्ये 2.4 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो.

अमेरिकेवर काय परिणाम होणार?

अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या टॅरिफचा अमेरिकेला देखील तेवढाच फटका बसणार आहे. सध्या अमेरिकेमध्ये महागाईचा दर 2.8 टक्क्यांच्या आसपास आहे. तर अमेरिकेतील अनेक क्षेत्र हे आयातीवर अवलंबून आहेत. ज्यामध्ये अॅपेरल, ऑटोमोबाईलसाठी चीन, बांग्लादेशसह इतर देशांकडून आयात करावी लागते. त्यात आयात शुल्क वाढवल्याने स्वत: अमेरिकेलाच महागाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये महागाईचा दर 4.5 टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.

Pune News : आईने जुळ्या मुलांना टाकीत बुडवून मारलं, नंतर आत्महत्येचा प्रयत्न…

परिणामी अमेरिकेत विचाराधीन असलेली व्याजदर कमी करण्याचा प्रस्ताव पारित होणार नाही. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा कमी राहिल. लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी होईल. त्यामुळे अमेरिकेच्या अर्थिक प्रगतीची गती मंदावेल त्यामुळे मंदीचा धोका वाढेल. ज्या कंपन्या उत्पादन वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती करत होत्या त्या आता. उत्पादन वाढवण्याऐवजी कर चुकवण्यासाठी पैसा वापरतील त्यामुळे रोजगार निर्माण केले जाणार नाहीत. तसेच नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची देखील शक्यता आहे. तसेच जागतिक महामारी कोरोनानंतर जग सावरत असताना रशिया-युक्रेन आणि हमास- इस्त्रायल या देशांमधील युद्धाने जगाला प्रभावित केले होते. त्यानंतर मंदीचा धोका 15-20 टक्के होता. तो आता थेट 30-40 टक्क्यांवर पोहचला आहे.

follow us