US-Israel-Iran War: इस्रायल-इराणमध्ये (US-Israel-Iran War) गेल्या पंधरा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायल मिळून इराणवर हल्ला करत आहे. इराणही हवाई हल्ले करत आहे. इराणच्या स्टेट मीडियाने एक मोठा दावा केलाय. इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांचा मृत्यू झाल्याचा हा दावा आहे. जगातील इतर वृत्तसंस्थांनी याबाबत वृत्त दिलेले नाही. परंतु इस्रायलच्या पतंप्रधान नेतन्याहू गेल्या पाच दिवसांपासून गायब असल्याचे वृत्त काही माध्यम संस्थांनी दिलंय. ते त्यांच्या सोशल मीडियामध्येही गेल्या पाच दिवसांपासून सक्रीय नसल्याचे वृत्त आहे.
Benjamin Netanyahu not only appeared to have six fingers — his teeth also seemed to vanish and reappear.
Is Netanyahu dead?
— Humi (@silentd3fiance) March 13, 2026
गेल्या आठवड्यापासून ते सार्वजनिकपणे दिसून आलेले नाहीत. शुक्रवारी त्यांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे. या व्हिडिओवर इस्रायल नागरिकांनी शंका उपस्थित केलीय. व्हिडिओ दाखविलेली व्यक्ती ही पंतप्रधान नेतन्याहू नाही. तो व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआयने बनविलेला असल्याचा दावा केला जात आहे. नेतन्याहू यांच्या एकाला हाताला सहावी करंगळी दाखविण्यात आलेली आहे. इस्रायल सरकार आणि पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी बेंजामिन नेतन्याहू यांचा एक व्हिडिओ संदेश जाहीर केला. त्या आठ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये इराण युद्ध आणि देशातील समस्यांवर बोलत आहेत. त्यानंतर काही तासानंतर नवीन चर्चा सुरू झाली. कारण व्हिडिओत नेतन्याहू यांच्या डाव्या हाताला सहावी करंगळी दाखविण्यात आली आहे. त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ एआयने बनविल्याचा दावा केला जात आहे.
Hy @grok is this Real Benjamin Netanyahu? https://t.co/YV0P8CVl0C
— ZUBAIR 🦁 (@Zubair99778) March 13, 2026
इस्रायलच्या जनतेमध्ये चिंता
बेंजामिन नेतन्याहू यांच्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर अमेरिका कंजर्वेटिव पॉलिटिकल कमेंटेटर कॅंडिस ओवेन्स यांनी चिंता व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिले आहे. त्यात ते म्हणतात बीबी (नेतन्याहू) अखेर कुठे आहेत ? पंतप्रधान कार्यालय नेतन्याहूचे खोटे एआय व्हिडिओ प्रसिद्ध करत आहे. कारण इराणी मीडिया आणि सोशल मीडियावर त्यांचा मृत्यूच्या अफवेची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.
Channel 12: Prime Minister Benjamin Netanyahu has tasked former minister and longtime aide Ron Dermer with handling the Lebanon file for the duration of the war.
Dermer will lead talks with the US and potential negotiations with the Lebanese government if discussions begin in… pic.twitter.com/8PIAG7JlgG
— Mossad Commentary (@MOSSADil) March 13, 2026
2 मार्चला नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयावर मिसाइल डागल्याचा दावा इराण गार्ड्सने केला होता. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सने सांगितले की हल्ल्यात खेबार क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आहे. परंतु हा दावा इस्रायलने फेटाळून लावला होता.
