Trump Announces End to Iran-Israel War : भारत-पाक युद्धाच्या तयारीत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीची जशी घोषणा केली होती अगदी तशीच आत्ता सुरू असलेल्या (War) इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीबाबतही केली आहे. 12 दिवसांनंतर दोन्ही देश युद्ध थांबवण्यास तयार झाले आहे, असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर म्हटलं आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इराण-इस्त्रायल संघर्ष तीव्र होण्याची शक्यता होती.
सर्वांचे अभिनंदन! इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण युद्धबंदी झाली आहे. युद्धबंदी सहा तासांच्या आत सुरू होईल. इराणला प्रथम त्याचे पालन करावं लागेल. इराणने युद्धबंदीचं पालन केल्यानंतर पुढील 12 तासांनंतर इस्रायल युद्धबंदीत सामील होईल. 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचं मानलं जाईल. मी इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचे, त्यांच्याकडे असलेली सहनशक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता याबद्दल अभिनंदन करू इच्छितो असं ट्रम्प आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
मोठी बातमी, इराणकडून कतारमधील अमेरिकेच्या तळावर हल्ला; डागली 6 क्षेपणास्त्रे
13 जून रोजी इस्रायलने इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ले केले होते. गेल्या 12 दिवसांपासून दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू आहे. या संघर्षात इस्रायलला अमेरिकेचाही पाठिंबा मिळाला. त्यानंतर अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली. अमेरिकन सैन्याने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने पलटवार केला. इराणने कतारमधील दोहा येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागले. यामुळे इराण-अमेरिका तणाव वाढण्याची शक्यता वाढली होती. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमध्ये शस्त्रबंदीबाबत निर्णय झाल्याचं म्हटले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, इस्रायलनेही इराणसोबत युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. इराणने आता तेल अवीववर हल्ला केला नाही तर इस्त्रायल इराणवर हल्ला करणार नाही. इराणकडूनही आता तेल अवीववर हल्ला करणार नाही, असे सांगण्यात आले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी कतारमधील अमेरिकन लष्करी तळावरील हल्ल्यावर म्हटले आहे की, या हल्ल्यात आम्ही कोणालाही इजा केली नाही. या हल्ल्याची माहिती आम्ही कतारला आधीच दिली होती. इराण कोणत्याही परिस्थितीत कोणाचे आक्रमण स्वीकारणार नाही असंही ते म्हणाले.
US President Donald Trump posts, "CONGRATULATIONS TO EVERYONE! It has been fully agreed by and between Israel and Iran that there will be a Complete and Total CEASEFIRE (in approximately 6 hours from now, when Israel and Iran have wound down and completed their in progress, final… pic.twitter.com/a6mSgitrzn
— ANI (@ANI) June 23, 2025