Download App

अमेरिकेत आजपासून नवा गडी नवा डाव; डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार

ट्रम्प हे शपथविधीसाठी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथून हवाई दलाच्या सी-32 या लष्करी विमानातून

  • Written By: Last Updated:

Donald Trump Oath as US President Today : अमेरिकेत आजपासून पुन्हा एकदा ट्रम्पराज सुरू होतय. नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज सोमवार (दि. 20 जानेवारी)रोजी स्थानिक (Trump ) वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री १०.३० वाजता अध्यक्षपदाचा शपधविधी होणार आहे. या समारंभासाठी त्यांचे काल रविवारी वॉशिंग्टन येथे आगमन झाले आहे.

हश मनी केस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, तुरुंगात जावे लागणार नाही

ट्रम्प हे शपथविधीसाठी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत. फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथून हवाई दलाच्या सी-32 या लष्करी विमानातून त्यांनी उड्डाण केले. त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया आणि मुलगा बॅरन ट्रम्पदेखील आहेत. या विमानाला स्पेशल एअर मिशन 47 असे नाव देण्यात आले आहे. मिशन 47 म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष असतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हे विमान ट्रम्प यांना दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक ध्रुवीकरण करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. २०१७ मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये आले तेव्हा ते शहरातील बहुतेकांसाठी अनोळखी होते. आता आमच्याकडे अनुभव असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे रविवारी आपल्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी दक्षिण कॅरोलिनामध्ये होते.

बायबलच्या प्रतिवर हात ठेवून शपथ

या शपथविधी सोहळ्यात राष्ट्राध्यक्ष बायबलच्या प्रतिवर हात ठेवून शपथ घेतात. अर्थात, आपल्याला आपल्या आवडीचे राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख पुस्तकाची  निवड करता येते. ट्रम्प यांच्यासोबत उपाध्यक्ष वान्स हेदेखील शपथ घेणार आहेत.

वैयक्तिक निमंत्रित म्हणून उपस्थित

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्याला ट्रम्प कुटुंबाचे वैयक्तिक निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनसोबतचे संबंध सुधारण्यासाठी पदभार स्वीकारल्यानंतर चीनला भेट देण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांनी भारताच्या संभाव्य भेटीबाबत सल्लागारांशीही चर्चा केली.

follow us

संबंधित बातम्या