डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला ढोल ताशा; पुणेरी ‘शिवम’ ढोल पथकाचा आवाज घुमणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला ढोल ताशा; पुणेरी ‘शिवम’ ढोल पथकाचा आवाज घुमणार

Donald Trump Oath Ceremony : अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) सोमवारी शपथ घेतली. शपथ घेताच अमेरिकेत आता ट्रम्प पर्व सुरू झालं आहे. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेतील नियमांनुसार ट्र्म्प यांनी कामकाजास सुरुवात केली आहे. परंतु, नव्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत आणि भव्य मिरवणूक अशा काही कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प आणि त्यांच्या पक्षातील मंत्री, पाठीराखे, हितचिंतक मोटारीने तर काहीजण चालत पेनसिल्व्हानिया अॅव्हेन्यूवरून मिरवणूक निघेल. नंतर व्हाईट हाऊस येथे मिरवणुकीची सांगता होईल. या मिरवणुकीत रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या राज्यांतील शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांचे मार्चिंग बँड सहभागी होणार आहेत.

अभिमानाची गोष्ट म्हणजे टेक्सास राज्यातील डलास गावातील शिवम ढोलताशा पथकाला या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले आहे. भारतीयांसाठी हा एक अभिमानाचा क्षण म्हणता येईल. कारण या ढोल ताशा पथकाचे संस्थापक निखील पोटभरे पुण्याचे आहेत. अमेरिकेत जाऊन त्यांनी अस्सल मराठी मातीतली ढोल आणि ताशा वाद्यं नावारुपास आणली. महाराष्ट्रात गणेशोत्सवात ढोल ताशा पथकांचा निनाद असतोच पण हाच गजर आता साता समुद्रापारही घुमू लागलाय.

दक्षिण सीमेवर आणीबाणी, थर्ड जेंडर संपले; शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 10 मोठ्या घोषणा 

मराठी तरुण मंडळी अमेरिकेत स्थायिक झाली. ढोल ताशा पथक येथेही सुरू करावं असा विचार त्यांच्या मनात आला. डलास शहरात निखिल पोटभरे आणि हरिश नेहते यांच्या पुढाकारातून शिवम ढोल ताशा पथकाची स्थापना करण्यात आली. धार्मिक उत्सवांबरोबरच अमेरिकेतील विविध कार्यक्रमांत ढोल पथकाचा समावेश करण्याची संधी शोधण्यात येऊ लागली. यात पथकाला यश मिळालं. डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली कारकीर्द या पथकासाठी मोठी संधी ठरली.

हाऊडी मोदी इव्हेंट गाजवला

22 सप्टेंबर 2019 या दिवशी ह्यूस्टन येथे स्टेडियममध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत याच पथकाने केलं. उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या डॅलस मॅव्हरिक्स बास्केटबॉल आणि नॅशनल आइस हॉकी असोसिएशनची डॅलस स्टार्स यांच्या सामन्यातील मध्यंतरात भारतीय वाद्यांचा परिचय शिवम ढोल पथकाने करून दिला. इतकेच नाही तर आयसीसी टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्याचीही संधी पथकाला मिळाली.

Punit Balan : शिवमुद्रा ढोल ताशा पथक वाद्य पूजन सोहळा आणि सराव शुभारंभ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube