US Strike on Iran Posts In Iraq Syria : अमेरिकेने इराक आणि सीरियामधील इराणच्या चौक्यांवर तुफान हवाई हल्ले केल्याची (US Strike on Iran Posts In Iraq Syria) बातमी आहे. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. मागील आठवड्यात जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चिडलेल्या अमेरिकेने ही कारवाई केली. आम्ही हल्ले करू असा इशारा अमेरिकेने आधीच दिला होता मात्र हे हल्ले कधी आणि कुठे होतील याची माहिती नव्हती. इराक (Iraq) आणि सीरियातील (Syria) इराण समर्थित मिलिशिया आणि इराण (Iran) रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या
मागील रविवारी जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यात अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने इराणी सैनिकांना दोषी ठरवले आणि मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की आमची प्रतिक्रिया आजपासून सुरू होत आहे आम्ही वेळ आणि ठिकाण निश्चित करू. अमेरिकेला मध्य पूर्व किंवा जगात कुठेही संघर्ष नको आहे परंतु ज्यांना आमचे नुकसान करायचे आहे त्यांना हे माहिती असणे आवश्यक आहे की जर अमेरिकेचे काही नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल.
अमेरिका आणि इराण दोन्ही देशांनी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला. इराणशी थेट संघर्ष टाळून पुढील हल्ले रोखण्याची अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेचे कोणतेही हल्ले इराणच्या जमिनीवर केलेले नव्हते. यूएस सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) एका निवेदनात म्हटले आहे की हल्ल्यांमध्ये इराण रिव्हॉल्यूशनरी गार्ड आणि त्यांच्याशी संबंधित मिलिशिया गटांना लक्ष् करण्यात आले आहे. अमेरिकन बॉम्बफेक विमानांनी 85 हून आधिक ठिकाणांना लक्ष्य केले.
इराक सीमेजवळील शहरापासून शंभर किलोमीटरहून अधिक पसरलेल्या पूर्व सीरियाच्या मोठ्या भागाव केलेल्या कारवाईत शस्त्रांस्त्रांच्या डेपोसह इराणी समर्थक गटांच्या ताब्यात असलेल्या 26 प्रमुख ठिकाणांना फटका बसला, असे निरीक्षण गटाने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले. या हल्ल्यात येथील दहशतवादी गटांचा बिमोड करण्यात आला.