US withdraws as we will attack power plant Iranian media rejects Trump’s five-day ceasefire : पश्चिम आशियात सध्या तणावाची भीषण स्थिती निर्माण झाली असून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तुफान संघर्ष पेटला आहे. तिन्ही देशांकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेकडून काही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत देत युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी इराणकडून हल्ल्यांची तीव्रता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इराण सध्या माघार घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचे स्पष्ट होत आहे. 23 मार्च 2026 ला ट्रम्प यांनी एक दावा केला की, इराणवरील हल्ल्यांसाठी पाच दिवसांसाठी युद्धबंदी करण्यात आली आहे. मात्र इराणी माध्यामांनी त्यांचा हा दावा फेटाळला आहे.
नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी ‘Truth Social’ वर पोस्ट केले आहे की, मला हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, गेल्या दोन दिवसांत अमेरिका आणि इराण या देशांमध्ये, मध्यपूर्वेतील आपल्या परस्पर शत्रुत्वाचा संपूर्ण आणि निर्णायक निपटारा करण्याबाबत अत्यंत चांगल्या आणि फलदायी चर्चा झाल्या आहेत. या सखोल, तपशीलवार आणि विधायक चर्चांचा ज्या संपूर्ण आठवडाभर सुरू राहतील, एकूण सूर आणि स्वरूप लक्षात घेऊन, मी ‘युद्ध विभागाला’ (Department of War) असे निर्देश दिले आहेत की, इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर केले जाणारे कोणतेही आणि सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांच्या कालावधीसाठी स्थगित करण्यात यावेत अर्थात, हे स्थगितीकरण सध्या सुरू असलेल्या बैठका आणि चर्चांच्या यशावर अवलंबून असेल.
नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू…
यावर इराणी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी इराणच्या कोणत्याही चर्चा झालेल्या नाहीत. तसेच कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत देखील अशा कोणत्याही चर्चा झालेल्या नाही. ट्रम्प यांनी इराणमधील वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर केले जाणारे कोणतेही आणि सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांच्या कालावधीसाठी स्थगित करण्यात यावेत असं सांगितलं. मात्र त्यांनी हे इराण मध्य अशियातील वीज प्रकल्पांवर हल्ला करणार या भीतीने ट्रम्प यांनी माघार घेतला आहे. असं म्हणत इराणी माध्यामांनी त्यांचा हा दावा फेटाळला आहे.
Iranian state media: "There is no direct contact with Trump, not even through intermediaries. Trump retreated after hearing that our targets would be all power plants in West Asia."
— BNO News Live (@BNODesk) March 23, 2026
चला खरेदीला ! सोने-चांदीची झळाली संपली ? सोमवारी मोठी घसरण
ट्रम्प यांच्या या पूर्ण कॅपिटल लेटर्समध्ये असलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहीम रेजाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “लढाई सुरूच आहे आणि ही शत्रूसाठी आणखी एक पराभव आहे. ट्रंप आणि अमेरिका पुन्हा एकदा पराभूत झाले आहेत.” इराणकडून आलेली ही प्रतिक्रिया ट्रंप यांना उत्तेजित करणारी आहे. इराणने हे स्पष्ट केले आहे की पडद्यामागे किंवा प्रत्यक्षरित्या अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ट्रंप यांचे हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. इराण हे पाऊल अमेरिकेने आपल्यासमोर गुडघे टेकले असल्याचे सांगत आहे. या घडामोडींमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली असून, इराणच्या शेजारील देशांमध्येही काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे.
