Download App

अमेरिकेतील हिंदूंचा डोनाल्ड ट्रम्पला पाठिंबा, म्हणाले, कमला हॅरिस निवडून आल्यास भारत-अमेरिका संबंध…

कमला हॅरिस यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास भारत आणि अमेरिकेतील संबंध अस्थिर होऊ शकतात, असा दावा हिंदू संघटनेने केला

  • Written By: Last Updated:

America Presidential Election : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी (America Presidential Plection) नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कमला हॅरिस (Kamala Harris) या डेमोक्रॅटिक पक्षाकडून रिंगणात उतरल्या आहेत. तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिसऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मोठी बातमी! औषध कंपन्यांच्या गोदामाची इमारत कोसळली, 24 जण जखमी 

कमला हॅरिस यांची अध्यक्षपदी निवड झाल्यास भारत आणि अमेरिकेतील संबंध अस्थिर होऊ शकतात, असा दावा या हिंदू संघटनेने केला आहे. हिंदू संघटनेने पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनासारख्या राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या बाजूने मतदारांना एकत्र करण्यास सुरुवात केली आहे.

सोबत बाउन्सर घेऊन फिरणारे काय हिंदूंचे रक्षण करणार?, इम्तियाज जलील यांचा राणेंवर हल्लाबोल 

अमेरिकेतील हिंदू संघटना ‘हिंदूस फॉर अमेरिका फर्स्ट’चे संस्थापक अध्यक्ष उत्सव संदुजा यांनी गुरूवारी हा पाठिंबा दिला. ते म्हणाले की, जर कमला हॅरिस यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर अशा काही उदारमतवादी लोकांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्याची शक्यता आहे, ज्यांचे निर्णय आशियाई-अमेरिकन लोकांवर परिणाम करू शकतात. याशिवाय हॅरीस विजयी झाल्या तर भारत अन् अमेरिकेतील संबंधांवर विपरित परिणाम होईल.

बायडेन-हॅरिस प्रशासन अपयशी ठरले…
संदुजा पुढं म्हणाले की, ‘बायडेन-हॅरिस प्रशासनाने सीमा सुरक्षित करण्यासाठी काहीही केले नाही. कमला हॅरिस प्रशासनात दुसऱ्या क्रमांकावर होत्या, पण त्यांनी अवैध स्थलांतर रोखण्यासाठी काहीही केले नाही. अवैध स्थलांतरामुळे गुन्ह्यांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. याशिवाय अमली पदार्थांची तस्करी आदी घटनांमध्येही वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम अल्पसंख्याक समाजावर होत आहे. विशेषतः आशियाई-अमेरिकन व्यवसायांना याचा सर्वाधिक फटका बसला. संदुजा यांनी ट्रम्प यांचे कौतुक केले आणि अवैध स्थलांतर रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या धोरणांचे समर्थन केले.

ट्रम्प सत्तेत आल्यास भारतासोबत अनेक करार…
संदुजा म्हणाले की, ट्रम्प हे भारत समर्थक आहेत आणि त्यांचे पंतप्रधान मोदींसोबतचे संबंधही चांगले आहेत. ट्रम्प यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वाचे संरक्षण आणि तंत्रज्ञान सहकार्य करार झाले. ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यास ते भारतसोबत अनेक संरक्षण करार करु शकतात. तर कमला हॅरिस यांनी भारत आणि भारतातील लोकांबद्दल अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत, परंतु ट्रम्प यांनी कधीही भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला नाही.

दरम्यान, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, ऍरिझोना आणि नेवाडा यांसारख्या राज्यांमध्ये हिंदूज फॉर अमेरिका फर्स्ट ही संस्था ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचार करत आहे.

follow us