सोबत बाउन्सर घेऊन फिरणारे काय हिंदूंचे रक्षण करणार?, इम्तियाज जलील यांचा राणेंवर हल्लाबोल
Imtiaz Jalil : रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्याबद्दल विरोधात बोलला तर मशिदीत घुसून मारू, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला. 1 सप्टेंबर रोजी नगरमध्ये झालेल्या हिंदू समाजाच्या आंदोलनात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी भाष्य केलं.
‘शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या बायकोला माहिती नसते तर …, आव्हाडांचा फडणवीसांना खोचक टोला
स्वत: सोबत बाउन्सर आणि सहा सहा गाड्या घेऊन फिरणारे, स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ते काय हिंदूंचे रक्षण करणार आहे? असा टोला जलील यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.
जलील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, आम्ही बांगलादेशच्या घटनेचं समर्थन करत नाही. पण इथं मोर्चे काढून अशी विधानं करणं योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर एक पिल्लू अहमदनगरला पाठवलं. मशिदीत घुसून बोलण्याचं वक्तव्य केलं. स्वत: सोबत बाउन्सर आणि सहा सहा गाड्या घेऊन फिरणारे, स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ते काय हिंदूंचे रक्षण करणार आहे? असा टोला जलील यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.
आम्ही जन आक्रोश मोर्चा काढू
जलील म्हणाले, कोणी घुसून मारण्याची भाषा करत असेल तर आम्ही गप बसणारे आहे. एमआयएमची ताकद दाखवू. सध्या गणेशोत्सवाचे वातावरण सुरू आहे. त्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत. आम्ही जन आक्रोश मोर्चा काढू शकतो. मुंबईत जाऊन लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, जेव्हा मुंबईला आमचा ताफा निघेल, तेव्हा कोण इम्तियाज जलील आहे, हे माहित पडेल, अशा शब्दात जलील यांनी राणे यांचे नाव न घेता शारा दिला.
हिम्मत असेल तर पुण्याचे नाव बदला, कोल्हापूरचे नाव बदला, नागपूरचे नाव बदला. एमआयएमचा माजी खासदार या नात्याने सांगतो, मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ठेवा. आमच्या शहरात येऊन फक्त राजनीती करायची होती म्हणून नाव बदललं, असं जलील म्हणाले.
आम्ही 100 जागांवर चर्चा करणार नाही
महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांशी आमची चर्चा झाली आहे. आमच्याकडे 25 जागांची ताकद असेल तर आम्ही 25 जागा मागू. आम्ही 100 जागांवर चर्चा करणार नाही. नऊ तारखेनंतर आम्ही किती जागा लढवायच्या हे आम्ही, आमचा पक्ष ठरवेल. जिथे चांगले उमेदवार मिळतील, तिथं पुन्हा ताकदीने विधानसभेच्या मैदानात उतरू, असा निर्धार जलील यांनी व्यक्त केला.