Lalit Modi : इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) काहींना काही कारणाने सोशल मीडीयावर चर्चेत राहतात. भारतीय तपास संस्थांनी गुन्हेगार घोषित केल्यानंतर वानुआतूचे (Vanuatu) पंतप्रधाल जोथम नापट (Jotham Napat) यांनी ललित मोदी यांना मोठा धक्का देत त्यांचे वानुआतूचे नागरिकत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहे. याबाबात वानुआटुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला मोदी यांचे वानुआटु पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
याबाबत माहिती देत वानुआतूचे पंतप्रधाल जोथम नापट म्हणाले की, मी नागरिकत्व आयोगाला मोदीचा वानुआटु पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती दिली. तसेच गेल्या 24 तासांत मला कळले की, इंटरपोलने भारतीय अधिकाऱ्यांनी ललित मोदीवर अलर्ट नोटीस जारी करण्याची विनंती दोनदा नाकरली आहे, कारण त्यांच्याकडे पुरेसे न्यायालयीन पुरावे नव्हते. अशी माहिती वानुआतूचे पंतप्रधाल जोथम नापट यांनी एका निवेदनात दिली आहे. माहितीनुसार, दक्षिण प्रशांत महासागरातील 80 हून अधिक बेटांची साखळी असलेल्या वानुआतूची लोकसंख्या सुमारे 3,000,00 आहे.
तर दुसरीकडे शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले होते की, ललित मोदी यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात त्यांचा पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केला आहे. सध्याच्या नियमांनुसार आणि प्रक्रियेनुसार त्याची चौकशी करण्यात येणार आहे. आमच्याकडे अशी देखील माहिती आहे की, त्याने वानुआटुचे नागरिकत्व घेतले आहे आणि आता आम्ही कायद्यानुसार त्याच्याविरुद्धचा खटला चालवत आहोत. अशी माहिती या प्रकरणात बोलताना शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली होती.
Vanuatu Prime Minister Jotham Napat directs the Citizenship Commission to cancel the Vanuatu passport issued to Lalit Modi. pic.twitter.com/Ogqgqv5JZj
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2025
मला भारतीय पासपोर्ट परत करायचा आहे. मला पॅसिफिक महासागरातील एक बेट देश वानुआतुचे नागरिकत्व मिळाले आहे. असं यापूर्वी ललित मोदी यांनी सांगितले होते.
इंडियन प्रीमियर लीग 2009 च्या वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपसोबत केलेल्या 425 कोटी रुपयांच्या टीव्ही हक्कांच्या करार आणि परकीय चलन उल्लंघनाच्या संदर्भात ललित मोदी यांची विविध एजन्सींकडून चौकशी सुरू आहे.
‘आमिर खान: सिनेमा का जादुगर’ ची घोषणा, ट्रेलर प्रदर्शित, साजरी होणार आमिर खानची अफलातून कारकीर्द
परकीय चलन उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांमध्ये मुंबईत आयकर आणि ईडी अधिकाऱ्यांसोबत फक्त एकदाच चौकशीला उपस्थित राहिल्यानंतर मे 2010 मध्ये ललित मोदी युकेला पळून गेले आहे. 2013 मध्ये एका समितीने ललित मोदीला आरोपांमध्ये दोषी ठरवल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली आणि त्याच्यावर आजीवन बंदी घातली आहे.