रशिया – युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता

  • Written By: Published:
रशिया – युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढणाऱ्या 12 भारतीयांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता

Russia Ukraine War : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या रशिया – युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) रशियाकडून लढणारे 12 भारतीयांचा मृत्यू झाला असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. तर या युद्धात 16 भारतीय बेपत्ता असल्याची देखील माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

तर रशिया-युक्रेन युद्धात केरळमधील त्रिशूर येथील नागरिक बिनिल बाबू (Binil Babu) यांच्या मृत्यूबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. मंत्रालयाने कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि आश्वासन दिले की भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे जेणेकरून मृत भारतीयांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात परत आणता येईल.

याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, बिनिल बाबू यांचे निधन अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी आमचा दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तर जखमी झाल्याने दुसऱ्या व्यक्तीवर मॉस्कोमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण केल्यानंतर तो लवकरच भारतात परतणार असल्याची माहिती देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

‘कितना समय लगेगा’?; जखमी अवस्थेत सैफने रिक्षा चालकाला विचारला होता प्रश्न; वाचा ‘त्या’ रात्रीचा थरार

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, 17 जानेवारी 2025 पर्यंत 126 भारतीय रशियाच्या बाजूने युद्धात उतरले आहे त्यापैकी 96 लोक भारतात परतले आहेत आणि त्यांना रशियन सशस्त्र दलातून बाहेर काढण्यात आले आहे. या युद्धात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बेपत्ता आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube