रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; मायदेशी पाठवण्याची केली होती विनवणी

  • Written By: Published:
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तरुणाचा मृत्यू, एक गंभीर; मायदेशी पाठवण्याची केली होती विनवणी

Binil T. B. death in Russia-Ukraine Conflict : रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिक व दोन्ही बाजूच्या हजारो नागरिकांनी प्राण गमावले आहेत. (Russia) दरम्यान, या युद्धात एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याचा एक नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाचं नाव बिनिल टी. बी. असं असून तो ३२ वर्षांचा होता.

मोठी बातमी! रशिया युक्रेनसोबत चर्चेस तयार; पुतिन म्हणाले, भारत-चीन करू शकतात मध्यस्थी

बिनिल हा केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी होता. तर, जैन टी. के. (वय २७) हा तरुण जखमी झाला आहे. तो देखील वडक्कनचेरी भागातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी बिनिलच्या कुटुंबीयांना माहिती मिळाली होती की एका ड्रोन हल्ल्यात केरळमधील दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बिनिलच्या कुटुंबाने अधिक माहिती मिळवण्याचा व बिनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बिनिलची माहिती मिळाली नाही. तसंच, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही.

बिनिल व जैन यांचे नातेवाईक सतीश यांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की बिनिलची पत्नी जोसी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. तिला दूतावासाकून अधिकृतरित्या बिनिलच्या निधनाचं वृत्त मिळालं आहे. रशियन सैन्याच्या हवाल्याने तिला ही माहिती देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube