ललित मोदींनी दिली करिअर संपवण्याची धमकी… माजी भारतीय क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा
Praveen Kumar on Lalit Modi : भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने (Praveen Kumar) एक खळबळजनक खुलासा केला आहे. आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी (Lalit Modi) यांनी करिअर संपवण्याची धमकी दिली होती, असे प्रवीणने म्हटले आहे. प्रवीणने 2008 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. नंतर तो किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स फ्रँचायझींमध्ये सामील झाला होता.
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) त्याला भाग व्हायचे नव्हते. त्याला आयपीएलच्या पहिल्या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळायचे होते. प्रवीणने सांगितले की, एका अधिकाऱ्याने चुकून त्याच्याकडून कागदावर सही करुन घेतली. स्वाक्षरी केलेला कागद करार असल्याचे नंतर त्याला समजले. यानंतर प्रवीणने ललित मोदींकडे याबद्दल बोलून पाहिले पण उपयोग झाला नाही.
प्रवीणने ‘द ललनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला आरसीबीकडून खेळायचे नव्हते कारण बंगळुरू माझ्या घरापासून खूप दूर होते. मला इंग्रजी येत नव्हते आणि जेवण माझ्या आवडीचे नव्हते. दिल्ली मेरठपासून अगदी जवळ आहे, त्यामुळे मला कधी कधी घरी जाता आले असते.
IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न…
तो पुढे म्हणाला, पण एका व्यक्तीने मला कागदावर सही करायला लावली. मला माहित नव्हते की एक करार आहे. मी त्याला सांगितले की मला बंगळुरूसाठी नाही तर दिल्लीसाठी खेळायचे आहे. यानंतर ललित मोदींनी मला फोन करून माझी कारकीर्द संपवण्याची धमकी दिली.
IND Vs ENG: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज, स्टार सलामीवीराचे पुनरागमन निश्चित
आयपीएलच्या इतिहासात प्रवीण हा पहिला चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. तो शेवटचा आयपीएल 2017 मध्ये खेळला होता. आयपीएलमध्ये त्याने एकूण 119 सामने खेळले आणि 90 विकेट्स घेतल्या. 2007 ते 2012 या काळात तो भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता.