इंधन चिक्कार पण, कचऱ्यातील अन्न खातात लोक; ‘या’ देशात पडला असा दुष्काळ

Venezuela Inflation : जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जिथे तुम्हाला पेट्रोल स्वस्त मिळले पण खाण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलामध्ये (Venezuela Inflation) जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी 18.2 टक्के साठा या एकट्याच देशात आहे. येथे तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी 65 रुपये द्यावे लागतील. पण, येथे […]

Venezuela

Venezuela

Venezuela Inflation : जगाच्या पाठीवर असा एक देश आहे जिथे तुम्हाला पेट्रोल स्वस्त मिळले पण खाण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलामध्ये (Venezuela Inflation) जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी 18.2 टक्के साठा या एकट्याच देशात आहे. येथे तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी 65 रुपये द्यावे लागतील. पण, येथे खाद्यपदार्थांच्या किंमती मात्र आवाक्याबाहेर आहेत.

या देशातील खाद्यपदार्थांच्या किंमती जगात सर्वाधिक आहेत. देशातील कोट्यावधी लोकांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येथील लोकांना देश सोडून जाणे भाग पडले आहे. देशात खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती आहे की येथे लोक कचऱ्यात खाद्यपदार्थ शोधत आहेत. येथे पडलेले पदार्थ लोक खात आहेत.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार व्हेनेझुएलामध्ये अन्नधान्य महागाई 426 टक्के आहे. हा जगातील उच्चांक आहे. भारतात हाच महागाईचा दर 3.84 टक्के आहे. म्हणजेच व्हेनेझुएलामध्ये खाद्यपदार्थांची किंमत भारतापेक्षा सुमारे 110 पटींनी जास्त आहे.

पंतप्रधानांनी स्वतःच्या मुलालाही सोडलं नाही; जपानमध्ये घडलं मोठं राजकीय नाट्य

मागील अनेक वर्षांपासून देशात खाद्यपदार्थांच्या किंमती खूप वाढल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी कर्ज फेडण्यासाठी बराच पैसा खर्च केला आहे. त्यामुळे चलनाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

सन 2019 मध्ये मादुरो यांनी चलन नियंत्रण शिथिल केले. आर्थिक धोरणांसह सरकारी खर्चात कपात आणि करांमध्ये वाढ यांमुळे देशात सुमारे वर्षभरापासून महागाई एक अंकी राहिली आहे. पण मागील वर्षाच्या अखेरीस व्हेनेझुएलातील महागाई अतिशय वेगाने वाढली. आज परिस्थिती अशी झाली आहे की देशातील श्रीमंत लोकही खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्याच्या स्थितीत नाहीत.

देशातील बाजारपेठा खाद्यपदार्थांनी भरल्या आहेत पण हे पदार्थ इतके महाग आहेत की फार कमी लोक ते खरेदी करण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे आता लोक एकाच वेळी जेवण करत आहेत किंवा आपल्याला कुणी काही देईल यावर अवलंबून आहेत. देशाची निम्म्याहून आधिक लोकसंख्या गरिबीत आयुष्य काढत आहे. 41 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी सांगितले की ते दिवसातून एक वेळचे जेवण घेत नाहीत.

चिंता वाढली, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जूनअखेर पुन्हा येणार कोरोनाची लाट

Exit mobile version