Black Toxic Rain In Tehran After Israel Attack : इस्रायल हवाई हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये आकाशातून काळा पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. आकाशात जमा झालेल्या काळ्याकुट्ट ढगांमुळे सूर्यदेखील दिसेनासा झाला आहे. तेहरानमध्ये पडणारा काळा पाऊस नेमका काय? आणि पावसाचे हे पाणी माणसाच्या अंगावर पडले तर, काय होईल याबद्दल जाणून घेऊया..
युद्धामुळे तेलाचा भडका! कच्च्या तेलाच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरल पार, जगावर मंदीचं सावट?
आकाशातून का पडतोय काळा पाऊस?
शनिवारी रात्री उशिरा इस्रायलने तेहरानमधील अनेक इंधन डेपो आणि तेलाशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यामध्ये ईशान्य तेहरानमधील अग्दसियाह तेल गोदाम, शहराच्या उत्तरेकडील शहरान तेल डेपो, दक्षिण तेहरानमधील एक रिफायनरी आणि राजधानीजवळील कारजमधील इंधन डेपोचा समावेश होता. हल्ल्यानंतर मोठी आग लागली आणि काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात पसरले. त्यानंतर पडलेल्या पावसाचे थेंब पाण्यासरखे नव्हे तर, काळ्या रंगाचे होते. ज्यामुळे गाड्या, छत आणि रस्त्यांवर काळे डाग पडत आहेत.
Iran Israel War : इराण आणि इस्रायलमधील युद्ध 12 मार्च रोजी संपणार?; डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
विषारी पाऊस मानवी शरीरावर पडला तर काय होईल?
इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर आकाशातून पाऊस सुरू झाला. हा पाऊस पाहण्यासाठी नागरिक बाल्कनीत आले मात्र, त्यावेळी पावसाचे थेंब पांढरे नव्हते तर, जाड काळे होते आणि त्याला तेलाचा एक वेगळा वास येत होता. इस्रायली हल्ल्यात नष्ट झालेले तेल डेपो आणि रिफायनरीजमधून गॅलन तेल आणि विषारी रसायने बाहेर पडली त्यामुळे तयार झालेल्या मिश्रणातून काळ्या रंगाचे थेंब पडू लागल्याचे सांगितले जात आहे.
आकाशातून कोसळणाऱ्या या काळ्या थेंबांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं काहूर निर्माण झाले असून, इराणी रेड क्रेसेंटने याबाबत आपत्कालीन इशारा जारी केला आहे.
आकाशातून पडणाऱ्या पावासाच्या काळ्या पावसाच्या थेंबात सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बनचे धोकादायक प्रमाण आहे. हा पाऊस इतका आम्लयुक्त आहे ज्यामुळे त्वचा जळू शकते तसेच फुफ्फुसांना कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरातील एअर कंडिशनर बंद करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तेहरानमधील हा पाऊस अणु किरणोत्सर्गाशी जोडलेला नसला तरी, त्यात धूर, राख आणि आरोग्यासाठी हानिकारक रासायनिक कण असू शकतात.
Following the attack on Iran's oil depot, dark clouds hung over Tehran as the government warned of potential acid rain. This amounts to a covert massacre of civilians. Damn this war—stop it now.#IranIsraelWar #Iran pic.twitter.com/wgKoMJ7Wge
— Crypto Liam (@liamjing2025) March 8, 2026
