इराण-अमेरिकेच्या युद्धात द. कोरियातील नियम चर्चेत; नागरिकांना अंघोळीसह मोबाईल चार्जिंगवर निर्बंध

South Korea कमी अंघोळ करा… इराण युद्धामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेच्या मित्रराष्ट्राने मोबाईल चार्जिंगसह अनेक गोष्टींवर लादल्या अटी.

  • Written By: Published:
इराण-अमेरिकेच्या युद्धात द.कोरियातील नवे नियम चर्चेत; नागरिकांना अंघोळीसह मोबाईल चार्जिंगवर निर्बंध

South Korea Imposed New Rules For Bath & Mobile Charging : इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामध्ये इंधन आणि ऊर्जेचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी दक्षिण कोरिया सरकारने कंबर कसली असून, नागरिकांसाठी 12 कलमी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये ऊर्जा बचतीसाठी नागरिकांनी कमी वेळ स्नान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत TV9 हिंदीने वृत्त प्रकाशित केले आहे.

ऊर्जा मंत्र्यांचे ‘मिशन सेव्हिंग’

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट बैठकीनंतर दक्षिण कोरियाचे ऊर्जा मंत्री किम सुंग-व्हान यांनी या ऊर्जा बचत मोहिमेची घोषणा केली. सध्या हे नियम ऐच्छिक ठेवण्यात आले आहेत, मात्र नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही, तर सरकार कडक पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले आहे. South Korea Imposed New Rules For Bath & Mobile Charging

काय आहेत सरकारच्या 12 सूचना?

सरकारने नागरिकांना ऊर्जा वाचवण्यासाठी कमी वेळ स्नान करण्याचा सल्ला दिला आहे. अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर कमी केल्यास मोठी ऊर्जा बचत होईल असा तर्क सरकारचा आहे. याशिवाय वाशिंग मशीनचा वापरही मर्यादित करण्यास सांगण्यात आले आहे. कपडे धुणे आणि व्हॅक्युम क्लिनरचा वापर फक्त विकेड्सला करण्यास सांगण्यात आले आहे. यााशिवाय फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे रात्रभर चार्जिंगला न लावता दिवसाच चार्ज करण्याबरोबर इंधानाच्या बचतीसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना विनाकारण कार रस्त्यावर न काढण्यास सांगण्यात आले आहे.

दक्षिण कोरिया इतका चिंतेत का?

दक्षिण कोरिया एकूण गरजेच्या 70 टक्के तेलाची आयात ‘होर्मुज सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) मधून करतो. इराण युद्धामुळे हा मार्ग विस्कळीत झाला आहे. सध्या दक्षिण कोरियाकडे केवळ 190 दशलक्ष बॅरल तेलाचा साठा शिल्लक असून, येथील तेलाचा दैनिक वापर 2.90 दशलक्ष बॅरल इतका आहे. तर, सध्या द.कोरियाकडे तेलाचा शिल्लक साठा हा 2 महिन्यांपेक्षाही कमी काळ पुरेल इतकाच आहे. द. कोरिया अमेरिकेचा जवळचा मित्र देश असूनही, भौगोलिक परिस्थिती आणि आयातीवर असलेल्या अवलंबित्वमुळे दक्षिण कोरियाला आता ‘काटकसरीचे’ धोरण अवलंबावे लागत आहे. त्यामुळे इराण- अमेरिका यांच्यात सुरू असलेले युद्ध जर अधिक लांबले, तर हे निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

follow us