Dhaka Violence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनाला अनेक प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक भागात व्यापक हिंसाचार, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट झाले आहे. तर अनेक वाहन देखील जाळण्यात आली आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले करण्यात आले. निदर्शकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर, लाठीचार्ज आणि गोळीबार केला. आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे.
तर दुसरीकडे या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर निदर्शक रस्ते अडवत आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या मुलाने दिली आहे. तसेच त्यांनी या शिक्षेचा निषेध करत हा निर्णय लवकरच येणार होता याबाबत मला माहिती होती. माझी आई भारतात सुरक्षित असून भारत त्यांना सुरक्षा देत आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे. तर शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यानंतर बांगलादेशने शेख हसीनाला परत पाठवण्याची मागणी भारताकडे केली आहे मात्र भारताने याबबात आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भारत शेख हसीनाला बांगलादेशला परत पाठवणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल कधीपासून? जाणून घ्या निवडणुकीची संभाव्य तारीख
शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की त्यांना आधीच माहिती होते की त्यांच्या आईला दोषी ठरवले जाईल आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येईल. त्यांनी त्यांच्या पक्षावरील बंदी उठवण्याचा इशाराही दिला आणि जर ती उठवली नाही तर त्यांचे समर्थक निवडणुकीपूर्वी निदर्शने करतील, जी नंतर हिंसक होऊ शकतात असा इशारा देखील दिला होत.
