Download App

अश्रुधुराचे गोळे, हवेत फायरिंग, अन् 90 जखमी; पाकव्याप्त काश्मिरात का तुटला संयम?

पाकव्याप्त काश्मिरात पीठ, वीजसह इतर गोष्टींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात 90 जण जखमी झाले आहेत.

Violence Protest Pakistan-occupied Kashmir : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्याची परिस्थिती भयावह झाली असून दैनंदिन लागणाऱ्या वस्तुंचा दर गगनाला भिडल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये पीठ, वीज या गोष्टींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने जनतेचा संयम तुटला असून रस्त्यावर उतरले (Violence Protest Pakistan-occupied Kashmir) आहेत. यावेळी घडलेल्या हिंसाचारात एका पोलिस अधिकाऱ्याच मुत्यू झालायं तर 90 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेनंतर पाकव्याप्त काश्मिरातील जनतेचा का संयम तुटला याबाबत सविस्तर पाहुयात…

सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही आहात का? उद्धव ठाकरेंना अमित शहांचा प्रश्न

पाकिस्तानचा अत्याचार, वाढती महागाई, कर आणि विजेचा तुटवडा यामुळे नागरिकांचा संयम तुटलायं. या अत्याचाराविरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या दरम्यान, जनता आणि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला. दरम्यान, पीओकेच्या लोकांनी शनिवारी 11 मे रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना आखली होती.

पाकव्याप्त काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) या निदर्शनांचे नेतृत्व करत आहे. संघटनेने शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर संप पुकारला होता. 11 मे रोजी मुझफ्फराबादकडे मोर्चा काढण्याची घोषणाही समितीने केली होती. PoK पोलिसांनी मुझफ्फराबाद आणि मीरपूर येथे छापे टाकून JAAC च्या 70 कार्यकर्त्यांना अटक केली. जेकेजेएसीची मुख्य मागणी म्हणजे वाढलेले दर आणि वीज बिलांची महागाई. जलविद्युतचा उत्पादन खर्च भरून काढल्यानंतर ग्राहकांनाही वीज मिळायला हवी, असे समितीचे म्हणणे आहे.

निवडणुकीच्या लाइव्ह कव्हरेजसाठी गेलेल्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात 70 पेक्षा अधिक लोकांना अटकर करण्यात आली असून, या घनांमुळे संतप्त जवान आता रत्त्यावर उतरून सुरक्षा दलांवर देगडफेक करत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले आहेत. तसंच, काही नागरिकही जखमी झाले आहेत. दरम्यान, सरकार विरोदात निदर्शने करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हिंसाचार घडल्यानंतर पाकिस्तानी लष्करी रेंजर्स या भागात तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोमवारी या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. शरीफ यांनी रविवारी पीओजेकेच्या पंतप्रधानांशीही बोलून शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही यावेळी शाहबाज शरीफ यांनी म्हटले.

जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीने मुझफ्फराबादपर्यंत लाँग मार्च काढण्याची घोषणा केल्यानंतर पीओकेमध्ये हिंसाचार सुरू झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व रस्ते बंद केले. शनिवारी लाँग मार्च सुरू झाला तेव्हा पीओकेच्या अनेक भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली.

follow us