Download App

Vladimir Putin : पुतिन एकदम फिट अँड फाईन; हार्टअटॅकच्या केवळ अफवा, क्रेमिनिलचा दावा

Image Credit: letsupp

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin ) यांना हार्टअटॅक आल्याच्या बातम्या आल्या होत्या. रशियातील एका टेलिग्राम चॅनेलने हा दावा केला होता. मात्र त्यानंतर क्रेमलिनने म्हणजे रशियन सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे की, व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त आहेत.

Pune : “शरद पवारांना मराठ्यांची अ‍ॅलर्जी का?” : पुण्यात आंदोलकांकडून ताफा अडविण्याचा प्रयत्न

काय म्हटलं होतं या टेलिग्राम चॅनलवर?

या टेलिग्राम चॅनलने म्हटलं होतं की, पुतिन गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी विदेश दौऱ्यावर जात होते. तेथे ते बॉडी डबल्ससह उपस्थित होते. तर आता हार्ट अटॅक आल्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी एका स्पेशल इनटेंसिव केअर यूनिटमध्ये उपचार घेत आहेत. तसेच डॉक्टरांनी त्यांच्यावर वेळीच उपचार करत हार्ट सर्जरी केली आहे. तर आता ते शुद्धीवर आले आहेत.

क्रेमलिनने दावा फेटाळून लावला..

टेलिग्राम चॅनेलने केलेला पुतिन यांच्या हार्ट अटॅकचा दावा क्रेमलिनने म्हणजे रशियन सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे की, व्लादिमीर पुतिन एकदम तंदुरूस्त आहेत. पत्रकारांशी बोलताना क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी तिन गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी विदेश दौऱ्यावर जात होते. तेथे ते बॉडी डबल्ससह उपस्थित होते. हा दावा फेटाळला.

मोहन भागवत अन् मोदी दोघेही देशाच्या आर्म अॅक्टचे गुन्हेगार; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

त्यानंतर क्रेमलिनने एक पत्रकही प्रसिद्ध केले ज्यामध्ये देखील हा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान 2022 पासून अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतिन हे कॅन्सर आणि पार्किन्ससने ग्रस्त आहेत. त्यामुळेच ते सार्वजनिक ठिकाणी जास्त जात नाहीत. तसेच या अगोदर देखील टेलिग्रामवर पुतिन यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे अशा अफवा रशियन सरकारने फेटाळून लावल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज