Download App

रशियन सैन्यासाठी उत्तर कोरियाचा फॉर्मुला; रशिया 4 महिन्यांत करणार दीड लाख सैन्य भरती..

एप्रिलपासून जुलैपर्यंत रशियाने 1 लाख 60 हजार सैन्य भरतीचा प्लॅन (Russian Armed Forces) तयार केला आहे.

Russian Armed Forces : उत्तर कोरियाचा हुकूमशहा (North Korea) किम जोंगच्या सैन्याला जगात सर्वाधिक धोकादायक समजले जाते. अमेरिकी रिपोर्टनुसार किमचे सैनिक आपल्यासोबत बॉम्ब घेऊनच असतात. शत्रूच्या हाती सापडल्यास या बॉम्बचा तत्काळ स्फोट घडवून आणला जातो. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन (Vladimir Putin) देखील याच पद्धतीने रशियन सैन्याला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनशी युद्ध सुरू (Russia Ukraine War) असतानाच पुतिन यांनी एक खास प्लॅन तयार केला आहे.

पॉलटिकोनुसार एप्रिलपासून जुलैपर्यंत रशियाने 1 लाख 60 हजार सैन्य भरतीचा प्लॅन (Russian Armed Forces) तयार केला आहे. या अंतर्गत दररोज 2 हजार सैनिकांची नियुक्ती केली जाईल. किम जोंग उन ज्या (Kim Jong Un) पद्धतीने सैन्य भरती करतात त्याच पद्धतीने पुतिन देखील सैन्य भरती करणार असल्याचे सांगण्यात आले.

उत्तर कोरियाचीच स्ट्रॅटेजी का..

उत्तर कोरियाप्रमाणेच पुतिन सैन्य भरती का करू इच्छित आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. यामागे कारणही खास आहे. युक्रेन विरूद्धच्या युद्धात रशियाला आतापर्यंत फक्त उत्तर कोरियाच्या सैनिकांची मदत मिळाली आहे. उत्तर कोरियाने 20 हजार सैनिक रशियात पाठवले आहेत. याच सैनिकांमुळे युद्ध अनिवार्य झाले आहे असे अमेरिकेला वाटते. युद्धाच्या मैदानात उत्तर कोरियाचे सैनिक युक्रेनला भारी पडत आहेत. याच सैनिकांच्या बळावर रशियाला कुर्स्क भागावर पुन्हा कब्जा मिळवता आला.

डोनाल्ड ट्रम्प पुतीनला झटका देणार; रशियाच्या तेलावर अतिरिक्त टॅरिफ लावणार? भारत, चीनला फटका बसणार

उत्तर कोरियाचे बहुतांश सैनिक 18 ते 30 वयोगटातील आहेत. रशियाने जी सैन्य भरती मोहीम हाती घेतली आहे त्यातही हीच वयोमर्यादा आहे. भरतीनंतर या सैनिकांना प्रशिक्षणासाठी उत्तर कोरियात धाडले जाऊ शकते. युद्धात जखमी झालेल्या रशियन सैनिकांवर उत्तर कोरियातील रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचा एक अहवाल काही दिवसांपूर्वी आला होता.

रशियाचे 10 लाख सैनिक मृत किंवा जखमी

कीव इंडिपेंडंटनुसार या युद्धात रशियाचे आतापर्यंत दहा लाख सैनिक एक तर मारले गेले आहेत किंवा जखमी तरी झाले आहेत. रशियाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, या युद्धात कमीत कमी एक लाख सैनिक मारले गेल्याचा दावा रशियन पत्रकारांकडून केला जात आहे. रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटले होते.

follow us