Download App

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’चे कौतुक

Vladimir Putin On Narendra Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. पुतिन यांनी ‘मेक इन इंडिया’ (Make in India) उपक्रमाचे कौतुक करत पंतप्रधान मोदी आपले मित्र असल्याचे म्हटले आहे. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन म्हणाले की आमचे मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडिया संकल्पना सुरू केली, ज्याचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत.

रशियन मीडिया वृत्तानुसार, आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रपतींनी आपल्या देशातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे उदाहरण दिले. ‘मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह’चा भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप सकारात्मक परिणाम झाला आहे, यावरही त्यांनी भर दिला. या कार्यक्रमादरम्यान पुतिन म्हणाले की, भारतातील आमचे मित्र आणि रशियाचे चांगले मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी ‘मेक इन इंडिया’ची संकल्पना मांडली होती आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जो चांगले काम करत असेल त्याला स्वीकारण्यात काही गैर नाही. भले काम करणारे आपण नसून आपले मित्रच आहेत.

LetsUpp Exclusive : समान नागरी कायदा नक्की काय आहे?

पुतिन यांनी स्थानिक उत्पादन विकसित केल्याबद्दल आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एक प्रभावी मॉडेल तयार केल्याबद्दल भारताचे कौतुक केले. आपली उत्पादने आधुनिक गुणांसह अधिक सोयीस्कर बनविण्याबाबत विचार करण्याची गरज आहे यावर पुतिन यांनी भर दिला.

त्याचबरोबर पुतिन म्हणाले की, युक्रेन युद्धानंतर अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा रशियावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे देशातील बाजारपेठ घसरलेली नाही. ते म्हणाले की, देशातून पाश्चिमात्य कंपन्या निघून गेल्याने रशियन उद्योजकांच्या संधी वाढल्या आहेत. त्याच वेळी, देशांतर्गत ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी रशियाला नवीन धोरणाची गरज आहे यावरही पुतीन यांनी भर दिला.

follow us

वेब स्टोरीज