इथिओपियमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, 18 किमी उंचीपर्यंत राख अन् गॅसचे लोट; भारताला काय धोका?

Volcano erupts इथेओपियाच्या दनाकिल भागामध्ये सोमवारी तब्बल दहा हजार वर्षांनंतर सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला.

Volcano Erupts

Volcano Erupts

Volcano erupts in Ethiopia ash and gas plume rises to 18 km height; What is threat to India : इथेओपियाच्या दनाकिल भागामध्ये सोमवारी तब्बल दहा हजार वर्षांनंतर सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्याचं नाव हॅली गुब्बी आहे. जो आतापर्यंत शांत मानला जात होता. ज्या ठिकाणी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ही जागा प्रसिद्ध अशा एरटा एले ज्वालामुखी पासून केवळ पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.

ग्रह नक्षत्रांच्या भ्रमणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

सोमवारी सकाळी तेथील स्थानिक वेळेनुसार साडेआठ वाजता हा उद्रेक झाला. यातून दहा ते पंधरा किलोमीटर उंच राखेचे लोट पसरले होते. ही राख आणि गॅस हवेसोबत वाहून दक्षिण-पश्चिम अरबी समुद्राकडे येत आहे. हॅली गुब्बी हा शील्ड टाईप ज्वालामुखी आहे वैज्ञानिकांच्या माहितीनुसार या ज्वालामुखीचा गेल्या हजारो वर्षांपासून रेकॉर्ड मिळालेला नाही. त्यामुळे दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारे उद्रेक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राधाकृष्ण विखेंनी राष्ट्रवादीत पाठविले का ? काका कोयटेंचे थेट उत्तर

यावर सध्या सॅटॅलाइटच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. ज्यामध्ये सॅटॅलाइट ने काढलेल्या फोटोंमध्ये या भागात उद्रेकानंतर राखीचे लोटचे लोड दिसत आहे. ज्यामध्ये सल्फर डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात दिसते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ज्वालामुखीचा उद्रेक निवासी भागापासून दूर झाल्याने आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र हे उद्रेकानंतर हवेमध्ये पसरलेली प्रचंड मोठे राखेचे लोट आणि गॅस हे विमान वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतात. त्याचबरोबर पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्याचबरोबर आता या उद्रेकाचा वेग मोठ्या प्रमाणात कमी झाला असून आणखी काही स्पोट होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी झाली असली तरी लावारसाची हालचाल धरणीकंप आणि गॅस यावरती वैज्ञानिकांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

इतके सगळे चुकीची काम करुनही त्यांची आठवण येते…, मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख बोलले

दरम्यान या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा भारतीय किंवा आसपासच्या देशांवर काय परिणाम होणार? तर यामध्ये विमान वाहतूक वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. मोठ्या प्रमाणात सल्फर डाय-ऑक्साइड बाहेर पडल्याने पर्यावरण आणि आरोग्यावर मोठ संकट निर्माण झालं आहे. त्याचबरोबर यातून अचानक अशा प्रकारे सल्फर डायऑक्साइड बाहेर पडत आहे. तर जमिनीच्या आतून आणखी दबाव वाढवून आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. भारताच्या आकाशात देखील ही राख येण्याची शक्यता आहे. यासाठी हवाई वाहतूक रद्द करण्यात आले आहे.

Exit mobile version