Volodymyr Zelensky : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी (दि. 23) राजधानी कीव येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची बाजू मांडली. दरम्यान, या भेटीनंतर झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भारताने तटस्थ भूमिका न स्वीकारता आपल्या बाजूने यावे, असे आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.
मोदी-योगींचे कौतुक पडले महागात, संतापलेल्या पतीने मारहाण करत दिला तिहेरी तलाक
रशिया-युक्रेन युद्धाच्या अडीच वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले. मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात सुमारे 3 तास चर्चा झाली. तत्पूर्वी, मोदी झेलेन्स्की यांच्यासोबत युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात गेले, जिथे त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी बालस्मारकावर एक बाहुलीही ठेवली.
मुलांच्या हौतात्म्याचे ठिकाण पाहून मन भरून आले – मोदी
मोदी म्हणाले, लहान मुलांच्या हौतात्म्याचे ठिकाण पाहून मन भरून आले आहे. मला विशेषतः तुमच्याशी शांततेवर चर्चा करायची आहे. मला खात्री द्यायची आहे की भारत शांततेसाठी प्रत्येक प्रयत्नात सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे. जर मी यात काही योगदान देऊ शकलो तर मला एक मित्र म्हणून नक्कीच ते करायला आवडेल, असं मोदी म्हणाले.
भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा – झेलेन्स्की
दरम्यान, या भेटीनंतर मीडियाशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, पीएम मोदींसोबतची भेट खूप चांगली होती. युक्रेनमध्ये आल्याबद्दल मी मोदींचा खूप आभारी आहे. भारत हा जगातील महत्त्वाचा देश आहे आणि शांतता प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावू शकतो. आम्हाला भारतासोबतचे संबंध दृढ करायचे आहेत. युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेण्याऐवजी भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी आमची इच्छा असल्याचं झेलेन्स्की म्हणाले.
‘मी बेकसूर, माझी पॉलीग्राफ टेस्ट करा…’; कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणातील आरोपीचा यूटर्न
ते म्हणाले, मोदी नुकतेच रशियाला गेले होते. पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मला माहीत नाही. पण, पंतप्रधान मोदींच्या अधिकृत दौऱ्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केला. यावरून हे समजते की, रशियन राष्ट्राध्यक्ष भारताचा आणि भारताच्या पंतप्रधानांचा आदर करत नाहीत. त्यांचे आपल्या देशाच्या सैन्यावरही नियंत्रण नाही. युद्ध संपवायचे असेल तर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले.
या भेटीनंतर काय म्हणाले मोदी?
मोदी म्हणाले, युद्ध मुलांसाठी विनाशकारी आहे. युद्ध आणि हिंसाचार हा समस्येवरचा उपाय नाही. संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच प्रदेशात स्थिरता सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग आहे. भारत शांतता राखण्याच्या प्रयत्नांमध्ये सक्रिय भूमिका बजावेल. आम्ही पहिल्या दिवसापासून शांततेच्या बाजूने आहोत. भारताला युक्रेनमध्ये शांतता हवी आहे. भारत नेहमीच युक्रेनच्या पाठीशी उभा राहील. युद्धाबाबत भारताची भूमिका कधीही तटस्थ राहिली नाही, आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने आहोत, असं मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वी मी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती. त्यानंतर मी त्यांच्याकडे मीडियासमोर डोळ्यात डोळे टाकून सांगितले की, ही युद्धाची वेळ नाही.
झेलेन्स्की यांना दिले भारत भेटीचे निमंत्रण
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. आम्हाला आशा आहे की झेलेन्स्की त्यांच्या सोयीनुसार भारतात येतील.